Download App

‘शाहु महाराजांवर गाढवांनी बोलू नये’; आंबेडकरांनी ठाकरे, पवारांनाही सोडलं नाही…

Prakash Ambedkar On Sharad Pawar & Udhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीकेची तोफ डागण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, एकीकडे वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाला नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहु महाराजांना (Shahu Maharaj) आंबडेकरांनी पाठिंबा देत त्यांच्यावरील टीकाकारांचा समाचार घेतलायं. शाहु महाराजांवर गाढवांनी बोलू नये, या शब्दांत आंबेडकरांनी भाजपचे खासदार संजय मंडलिकांवर (Sanjay Mandlik) टीका केली आहे. सोबतच प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही आरोप केला आहे.

Bihar Politics : आधी मासे, आता संत्री! भाजपला खिजवण्यासाठी यादव-सहनींचे ऑरेंज पॉलिटिक्स

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, शाहु महाराजांचे वंशज कोण आहेत? हे संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे, असं असतानाच गाढवांनी त्यावर बोलावे, त्यावर काहीही बोलण्याची गरज नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. शाहु महाराजांच्या जवळचे आणि त्यांचे कुटुंबिय कोण हे सर्वांनाच माहित आहे. जगाने एकदा मान्य केल्यानंतर गाढवांनी त्यावर कमेंट करु नये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का, त्यांच्याकडे नेता नाही…; फडणवीसांची टीका

काय म्हणाले होते संजय मंडलिक?
नेसरी येथे झालेल्या प्रचार सभेत खासदार मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर टीका केली. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खर्‍या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार? अशी विचारणा करत मंडलिक यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते कोल्हापूरमध्ये दत्तकच आले आहेत, ते खरे वारसदार नाहीत, असं मंडलिक म्हणाले होते.

शरद पवार, उद्धव ठाकरेंकडून मॅच फिक्सिंग :
बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने सलग पाचवेळा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला संधी दिली आहे. बीडसह राज्यात अशी अनेक नावे असून ती नावे मी सांगू शकतो. नवे चेहरे असतानाही जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली नाही. तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून जुन्या उमेदवाराला आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला संधी दिली आहे. ही मॅच फिक्सिंग नाही का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

follow us