Download App

‘आम्ही ठाकरे गटासोबत, पण ‘इंडिया’ आघाडीत नाही’; प्रकाश आंबेडकरांचं विधान

काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षांची वज्रमूठ ठरलेल्या इंडिया आघाडीची उद्या तिसरी परिषद मुंबईत पार पडणार आहे. देशातल्या सर्वच भाजपविरोधी पक्षांना सोबत घेत आगामी निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए अशी लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत, अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) आम्ही इंडिया आघाडीत नसून शिवसेना ठाकरे गटाशी युती असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच इंडिया परिषदेच्या निमंत्रणाबाबत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी निमंत्रण आलं नसल्याचं सांगितलं आहे.

Wadhawan बंधूंवर मेहेरबान झालेल्या पोलिसांना दणका : एका अधिकाऱ्यासह 7 जणांवर मोठी कारवाई

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही शिवसेनेसोबत आहोत, आम्हाला इंडिया परिषदेचं निमंत्रण का नाही? हे काँग्रेसला विचारा, आम्ही ऑफर दिली पण काँग्रेसच निमंत्रण देत नाही, त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीत नसल्याचं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

‘इंडिया’ आघाडीचा मुंबईतील बैठकीचा कार्यक्रम जाहीर, कधी काय होणार ते जाणून घ्या

तसेच आमची बाजू शिवसेना ठाकरे गट मांडणार असून आमचे वकील उद्धव ठाकरे असल्याचंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी आमचं म्हणणं इंडियामध्ये मांडावं, आमच्या बाजून शिवसेना उद्धव ठाकरे गट बॅटिंग करणार असून वंचित महाविकास आघाडीमध्ये नसून इंडियाचं आम्हाला निमंत्रण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

केनियातून भारतात येणारे तब्बल 44 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

यावेळी बोलताना त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावर भाष्य केलं असून ते म्हणाले, ज्या दिवशी भीमा कोरेगाव परिसरांत हिंसाचार घडला, त्या घटनेच्या आधी सांगलीतून काही लोकं पुण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे भीमा कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला.

दंगलीच्या दिवशी परिसराच्या 20 किमी अंतरावरील लोकांचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत, तसेच सांगलीवरुन आलेल्या लोकांनी भीमा कोरेगाव ठिकाणी भेट दिली की नाही? याबाबत चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणामध्ये संभाजी भिडेचा मोठा रोल असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us