Download App

‘अर्थ खात्याकडून पैसे वेळेवर मिळत नाही…म्हणून अडचणी’; प्रताप सरनाईकांनी केली अजित पवारांना विनंती

Pratap Sarnaik Share Problem ST Corporation Does Not Receive Money On Time : राज्य सरकार एसटी प्रवासामध्ये (ST Corporation) सवलत देणाऱ्या अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये महिला सन्मान योजनेचा मोठा वाटा आहे. याद्वारे महिलांनी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात आहे. या माध्यमातून राज्य सरकार एसटी महामंडळाला प्रतिपूर्ती म्हणून पैसे देते. परंतु याच सवलत योजनांचे पैसे वेळेवर मिळत नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होतात, असं पालघर जिल्हा दौऱ्यावर असताना राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) सांगितलं.

यावेळी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्याचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांना विनंती केलीय. त्यांनी म्हटलं की, आमची प्रवासी संख्या वाढली आहे. परंतु शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून जे पैसे आम्हाला मिळतात. ते जर वेळेवर मिळाले तर आम्ही नक्कीच नफ्यात जाऊ. अर्थ खात्याकडून कधी-कधी ते पैसे वेळेवर मिळत नाही. म्हणून अडचणी निर्माण होतात. अर्थ खात्यातर्फे आम्हाला योग्य सहकार्य मिळालं पाहिजे, असी मी अजित पवार यांना विनंती केली आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ताब्यात, आज भारतात आणणार; दिल्ली अन् मुंबईत कोठड्या तयार

एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सन. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे 26 वे अध्यक्ष असणारं आहेत.

सावधान! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा; हवामानाचा विभागाचा इशारा

महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

 

follow us