Download App

प्रतिभा पवारांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, गेटवरच अडवली गाडी…

रद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले.

  • Written By: Last Updated:

Pratibha Pawar : बारामतीत सध्या विधानसभा निवडणुकीवरुन चांगलंच वातावरण तापलं. अशातच आता बारामतीत शरद पवा (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. त्यांच्यासोबत नात रेवती सुळेही (Revati Sule) होत्या. सुमारे अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अर्धा तास थांबल्यानंतरही आतमध्ये सोडले नाही, अशी माहिती खा. सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला; जिवंत काडतुसं, रायफलींसह 9 काश्मिरी तरूणांना अटक 

प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जात होत्या. त्या खरेदीसाठी पार्कमध्ये आल्या होत्या. मात्र, त्यांची गाडी गेटजवळ आल्यानंतर त्यांना थांबवण्यात आले. टेक्सस्टाईल पार्कच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची कार रोखली. सुमारे अर्धा तास त्यांना गेटवर थांबवलं होतं. त्यांची गाडी आत सोडली नाही. सुनेत्रा पवार ह्या या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत.

दरम्यान, प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना अडवल्याचा व्हिडिओही आता समोर आला. प्रतिभा पवार नात रेवती यांच्यासोबत बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर त्यांना अडवण्यात आलं. गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी जास्त काही उत्तर दिलं नसल्याचं दिसून आलं.

मनसेला धक्का! राज ठाकरेंच्या शिलेदाराचा भाजपला पाठिंबा; नाशकात काय घडलं? 

या व्हिडिओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला विचारत होत्या की, आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद का केलं? गेट बंद करायला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणाचा फोन आला? आतील दुकाने बंद आहेत का? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे. आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायंच आहे, असं त्या व्हिडिओत म्हणत आहे. तर आम्हाला वरून आदेश आलेत, फोन आला, त्यामुळं गेट लावलं, असं गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितलं.

सुमारे अर्धा तास प्रतिभा पवार यांना गेटवरचं थांबवण्यात आलं. मात्र, या अडवणुकीचे कारण समजू शकलं नाही.

दरम्यान, प्रतिभा पवार सध्या युगेंद्र पवार यांच्या प्रचारात उतरलेल्या आहेत. त्या मतदारांच्या गाठीभेट घेत आहेत. रेवती सुळेही युगेंद्र पवारांचा प्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांना गेटवरच रोखल्याची चर्चा आहे.

 

 

follow us