मनसेला धक्का! राज ठाकरेंच्या शिलेदाराचा भाजपला पाठिंबा; नाशकात काय घडलं?

मनसेला धक्का! राज ठाकरेंच्या शिलेदाराचा भाजपला पाठिंबा; नाशकात काय घडलं?

Raj Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार (Maharashtra Election) दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यातच आता नाशिकमध्ये (Nashik News) मनसेला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे (MNS) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सीमा हिरे यांना दातीर यांनी पाठिंबा दिला आहे.

या मतदारसंघातून दिलीप दातीर मनसेकडून इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज होते. प्रचाराचे दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच दिलीप दातीर यांनी सीमा हिरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे त्यांची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. दातीर यांच्या या निर्णयामुळे भाजपाला मात्र फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर.. नाशिकमध्ये राज ठाकरे स्पष्टच बोलले

याआधी नाशिकचे माजी महापौर आणि मनसे नेते अशोक मुर्तडक यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. यानंतर आता दिलीप दातीर यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मागील दोन दिवसांत मनसेला दोन मोठे धक्के नाशिकमध्ये बसले आहेत.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने सीमा हिरे यांना तिकीट दिलं आहे. तर महाविकास आघाडीने सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे या मतदारसंघातील  निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच आता मनसे नेते दिलीप दातीर यांनी भाजप उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube