निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला; जिवंत काडतुसं, रायफलींसह 9 काश्मिरी तरूणांना अटक

निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला; जिवंत काडतुसं, रायफलींसह 9 काश्मिरी तरूणांना अटक

9 Rifles 58 Live Cartridges Seized from Jammu Kashmir Accused : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar Crime News) मोठी कारवाई करण्यात आलीय. अहिल्यानगरमध्ये काश्मीर येथील 9 तरूणांना अटक करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणांकडून 9 रायफली अन् 58 काडतुसं जप्त करण्यात (crime news) आलीय. लष्कराचा गुप्तचर विभाग आणि तोफखाना पोलिसांनी ही कारवाई एकत्रितपणे केलीय.

अहिल्यानगरमध्ये ही मोठी कारवाई केल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरू केलीय. अजून शस्त्रसाठा अन् तरूण सापडू शकतात, असा अंदाज पोलिसांना आहे. सध्या शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचं वातावरण आहे, अशातच ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या टोळीचा मुख्य सुत्रधार शब्बीर मोहम्मद गुज्जर असल्याचं समोर आलंय. त्याने शहरातील तारकपूर भागामध्ये मूळच्या राजौरीचा असलेल्या शेरखान यांच्याकडून 2015 मध्ये बनावट शस्त्र परवाना आणि 12 बोअरवेलची रायफल खरेदी केली होती.

चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण?, भाजप नेते घेणार सभा

त्यानंतर राजौरी येथील काही तरूणांना बोलावून घेतलं. याबाबतची भनक लष्कराच्या गुप्तचर विभागाला लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर विभागाने तोफखाना पोलिसांसोबत याप्रकरणी तपास करायला सुरूवात केली होती. तपासादरम्यान आरोपींकडे धक्कादायक माहिती आढळली. जम्मू आणि काश्मिमधील काही व्यक्तींनी बनावट माहितीच्या आधारे अहिल्यानगर शहर आणि आजुबाजूच्या परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहोत, अशी माहिती तोफखाना पोलीस आणि लष्कर गुप्तचर विभागाला मिळाली होती.

तिवसा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार, यशोमती ठाकूर यांचे आश्वासन

त्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने छापा टाकला. त्यांनी अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणाहून या नऊ आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व नऊ आरोपी जम्मू-काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालंय. या आरोपीकडून 12 बोअरच्या नऊ रायफली, बनावट शस्त्र परवाने अन् 58 जिवंत काडतुसे सापडली आहेत. या 9 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा या आरोपांना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तसंच या कारवाईनंतर पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतलेली आहे. याप्रकरणी आणखी शस्त्रसाठा अन् संबंधित तरूण सापडतील, अशी शक्यता पोलिसांना आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube