चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण?, भाजप नेते घेणार सभा
Maharashtra Assembly Election 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी अंतिम टप्प्यात प्रचार सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये चार सभांचं नियोजन होतं. (Maharashtra Assembly) त्यासाठी ते शनिवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले होते. मात्र, अमित शाह तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या सभा भाजपचे इतर नेते घेणार आहेत.
अमितशाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही अपरिहार्य कारणाने त्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याऐवजी भाजपचे अन्य नेते सभा घेतील, अशी माहिती आहे.
चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार : खासदार संजय राऊत
आज अमित शाह यांच्या गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर अशा सर्व चार सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्याची पूर्ण तयारीदेखील झाली होती. मात्र, अचानक त्यांनी दौरा रद्द केला. त्याचं कारण समजू शकलेलं नाही.
नागपुरातल्या हॉटेल एडिसन ब्लू येथे अमित शाह थांबलेले होते. दौरा रद्द झाल्याने ते नागपूर विमानतळासाठी रवाना होत आहेत. आज ते सभेसाठी गडचिरोलीला रवाना होणार होते. परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्याची महािती आहे.