Download App

ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज देताच दरेकर, मुनगंटीवारांसह दिग्गज नेते ढाल बनून मैदानात, म्हणाले, रावण कुणाचा…

Pravin Darekar On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray

  • Written By: Last Updated:

Pravin Darekar On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता विधानसभा निवडणुकीत भाजपची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी पुन्हा उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी मला आणि आदित्य ठाकरेला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे त्यामुळे राजकारणात एकतर ते राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष, चिन्ह आणि पैसे नाही मात्र फक्त शिवसैनिकांच्या हिंमतीवर आव्हान देत आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपाकडून (BJP) देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. प्रवीण दरेकर म्हणाले की, अत्यंत पोकळ प्रकारचा आव्हान आहे. देवेंद्र जी ने महाराष्ट्राचा राजकारण समर्थपणे केला आहे. पाच वर्ष उत्तम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र जी ने काम केला आहे. तर आता दोन्ही पक्षांनासोबत घेऊन जनतेच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील यांना देवेंद्र फडणवीसांबद्दल कमालीचा दोष आहे. त्यामुळे अशा प्रकारचे भावना त्यांच्यामधून उठत असतात.

देवेंद्र जी वर दोषाने बोल्याशिवाय त्यांच्या मनाचा समाधान होत नाही. त्यामुळे सभा किंवा मेळाव्यात देवेंद्र फडणीसांवर बोलून त्यांच्या मनातील राग भागून घेतात. मात्र देवेंद्र फडणवीस कधीही नाक्या वरच्या भांडणासारखे कधीही बोलत नाही. ते महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत राजकारणी आहे. ते अरे ला कारे ते करत नाही. उद्धव ठाकरे यांचा भाषण महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभा देणारा नाही. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांचे व्यक्तव्य हेच गुर्मी आहे आणि जे गुर्मीत बोलतोय त्याने गुर्मी उतरायची भाषा करणे म्हणजे योग्य नाही. पराभवाला यश म्हणून ढोल पिटवण्याचा काम ठाकरेंकडून सुरु आहे. मोदी जी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत कळेल कोण कोणाची जिरवते. असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले.

तर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोल करत ज्यांना लोकशाही मान्य आहे. गुर्मी उतरवण्याचा काम देशभक्त जनता करत असते. रावण कुणाची गुर्मी उतरवू शकला नाही, गौरव कुणाची गुर्मी उतरवू शकले नाही आणि ना आता एक व्यक्ती लोकशाहीमध्ये कुणाची गुर्मी उतरवू शकते. गुर्मी उतरवण्याचा काम मतदारांचा आहे.

पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग, एम्स बोर्डाचही प्रमाणपत्र, कोर्टात नेमकं काय घडलं..

महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे मार्गदर्शक आहे हे काँग्रेस मानत ना राष्ट्रवादी मानत. त्यांच्याकडून अनेकदा मुख्यमंत्री पदाची दावेदारी करण्यात आली आहे, मात्र त्यांना महाविकास आघाडीमध्ये कुणीही मान्यता द्याला तयार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे असे वक्तव्य करत असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वैफल्यातून आणि रागातून उद्धव ठाकरे असे वक्तव्य करत असल्याची टीका देखील मुनगंटीवार यांनी केली.

follow us