प्रवीण दरेकरांचं नाव घेत फडणवीसांवर जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, ‘हे सर्व तेच घडवत आहेत’

प्रवीण दरेकरांचं नाव घेत फडणवीसांवर जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, ‘हे सर्व तेच घडवत आहेत’

Manoj Jarange Patil : गेली अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे अंतरवाली सराटी येथे उपोषण करत होते. मध्ये मुंबईपर्यंत हा मोर्चा गेला. त्यांना सध्या शांतता रॅली सुरू झाली. दरम्यान, ते आता पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. (Praveen Darekar) यावेळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती.

वयाच्या १४ व्या वर्षांपासून व्हिलचेअरवर; ४ वेळा UPSC पास पण नोकरी नाकारली, कार्तिक यांची व्यथा

जरांगे पाटील यांच्या या टीकेला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. दरेकर म्हणाले होते की, ‘जरांगे पाटील यांना पब्लिसिटी महत्वाची वाटत आहे. सर्व सामान्य महिलांना फायदा होत आहे त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिलो पाहिजे, म्हणून लाडकी बहीण योजनेवर ते आरोप करत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दरम्यान, जरांगे पाटील यांनीही उत्तर देत दरेकर यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सर्व घडवत आहेत आणि दरेकांनाही तेच बोलायला लावत आहेत असा थेट खळबळजनक आरोपच जरांगे यांनी केला आहे.

बातमी अपडेट होत आहे – 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube