Download App

‘अजितदादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये’, राज ठाकरेंना राष्ट्रवादीकडून ठोस प्रत्युत्तर

Amol Mitkari On Raj Thackeray : पुण्यात (Pune) झालेल्या मुसळधार पावसानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari On Raj Thackeray : पुण्यात (Pune) झालेल्या मुसळधार पावसानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्याचा दौरा करत शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती.

उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही शहरातील धरणातून पाणी वाहिले अशी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केली होती. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहे. तर आता राज ठाकरे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिला आहे.

या व्हिडिओमध्ये अमोल मिटकरी म्हणाले की, दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. टोलनाका, भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन या सुपारीबहाद्दरांचे यशस्वी झालेलं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता आता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासातील सार्वधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लावला.

काय म्हणाले होते राज ठाकरे

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिलं. मुळा – मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झाली आहे त्यामुळे आता अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सरकारने या गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लोकांची वाहने पाण्याखाली होती.

लोकांना पूर्वसूचना न देता पाणी सोडलं असेल तर सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही असं मी सांगतोय. टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही, शाळा, बाग या गोष्टी शहर नियोजनात येतात. पण राज्यात कुठेही हा प्रकार दिसत नाही. दिसली जमीन की विक हा प्रकार राज्यात सुरू आहे. अशी टीका पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवारांसह राज्य सरकारवर केली होती.

अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर मोठा अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us