Maharashtra Politics : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाने उचल खाल्ली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी होत (Maharashtra Politics) असून यासाठी आंदोलनेही झाली आहेत. मात्र या मागणीला विरोध वाढत असून आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे. काल आदिवासी समाजाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पुणे (Pune News) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळही (Narhari Zirwal) सहभागी झाले होते. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती यादीत समावेश करण्याचा विचार आणि प्रस्ताव सरकारने करू नये, असा इशारा झिरवळ यांनी सरकारला देऊन टाकला. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. सत्ताधारी अजित पवार गटातीलच हे दोघे नेते आता शिंदे सरकारची डोकेदुखी ठरताना दिसत आहेत.
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? शरद पवार अन् अजितदादांसाठी आजचा दिवस महत्वाचा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. राज्य सरकारनेही माजी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून कुणबी नोंदी शोधण्याचे काम जोरात सुरू केले आहे. तर दुसरीकडे यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. मराठा आरक्षणाचा मुद्दा जसा चर्चेत आला तेव्हापासूनच भुजबळ ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी नेतेही आले आहेत.
या घडामोडींमुळे राज्य सरकारची कोंडी होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा नवा ट्विस्ट आल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे धनगर आरक्षणानेही उचल खाल्ली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, सरकारने आश्वासन पाळावे अशी मागणी केली जात आहे. यासाठीही राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजबांधवांनी दोनदा उपोषण केले. त्यानंतर सरकारने बाहेरच्या राज्यातील धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली. धनगर समाजबांधवांना आश्वासन दिले. त्यानंतर तुर्तास तरी हे उपोषण मागे घेण्यात आले.
Pankaja Munde : ..तर मी पंकजा मुंडेंना CM करेन ! महादेव जानकरांचा भाजपला इशारा
या घडामोडींनंतर सरकारला काही दिलासा मिळत असतानाच सत्ताधारी अजित पवार गटातील नेते आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी काल पुण्यातील मोर्चात हजेरी लावली. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा विचार आणि प्रस्ताव सरकारने करुच नये. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी बिहार, मध्यप्रदेश, तेलंगाणा या राज्यांनी त्यांच्या अधिकारात घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेली समिती रद्द करावी असे झिरवळ यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला सुनावले. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यायला झिरवळांचा विरोध आहे. झिरवळ यांनी यापूर्वी आदिवासी समाजातील सर्वपक्षीय आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रपतींची भेट पण घेतली होती.