Supriya Sule : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असतानाच एक मोठी घडोमोड समोर आलीयं. पुण्यातील बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), शरद पवार(Sharad Pawar), सुप्रिया सुळे(Supriya Sule) एकत्र जमले आहेत. या भेटीची मोठी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) भेटीमागचं कारणही सांगून टाकलं आहे. दीवाळीनिमित्त दरवर्षी पवार कुटुंबिय एकत्र येत असतं, असं स्पष्टीकरण सुळेंनी एकत्र भेटीवर दिलं आहे.
Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं मराठा तरुणांच नुकसान होतंय’; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
सुळे म्हणाल्या, दरवर्षी पवार कुटुंब बारामती मध्ये एकत्र येत असतं. प्रताप पवारांच्या पत्नी आमच्या काकी आजारी आहेत. त्यामुळं त्या यावर्षी येवू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे आज पुण्यात दिवाळीसाठी एकत्र आलो. आमचा पाडवा, भाऊबीज यावर्षीही होणार असून आम्ही सगळे सणासाठी एकत्र येत असल्याचं सुळे यांनी सांगितलं आहे.
Diwali 2023 : धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? काय आहे धनत्रयोदशीचे महत्व?
तसेच अजितदादांना कितपत शक्य होईल माहिती नाही. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी आम्ही वैयक्तिक संबंध जपून असतो. एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो. प्रोफेश्नल आणि पर्सनल लाईफमध्ये फरक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
ऐन निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना धक्का; राज्य सहकारी बँकेने महत्वकांक्षी योजना गुंडाळली
अजितदादांची तब्येत अजूनही पूर्णपणे बरी नाही. त्यांना डेंग्यूची लक्षणं आहेत. त्यांनी काळजी घ्यायला हवी. दिल्लीत गेल्याची माहिती नाही. पण तिथे प्रदूषण खूप आहे. सगळ्यांनीच दिल्लीत खबरदारी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.
Ajit Pawar : पवार कुटुंबीय गोविंदबागेत जमणार; अजितदादा मात्र दूरच राहणार!
दरम्यान, शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी पवार कुटुंबिय एकत्र जमले होते. याआधी अजित पवार रक्षाबंधनाच्यावेळी आले नव्हते. त्यामुळे दिवाळीनिमित्त येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
याआधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर थोड्याच वेळात अजित पवार आणि शरद पवार प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्र जमले होते. अजित पवार येण्याआधीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे येथे पोहोचले होते. त्यानंतर आता अजित पवार भाऊबीजेला पुन्हा येणार का याचंही उत्तर लवकरच मिळणार आहे.