Download App

पुण्याला आणखी 2 आमदार मिळणार! ‘या’ 5 जागांसाठी इच्छुकांनी मंत्रालयापर्यंत लावली फिल्डिंग

Pune Will Get Two More MLA Legislative Council Seats : पुणे (Pune News) जिल्ह्याला गुडन्यूज मिळणार आहेत. लवकरच पुण्याला दोन आमदार मिळणार असल्याचं समोर येतंय. विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुका (Legislative Council Elections) जाहीर झाल्यात. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी (Pune MLAs) जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजप तीन, शिवसेना एक आणि अजित पवार राष्ट्रवादी एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

विधान परिषदेच्या या पाचही जागांसाठी महायुतीमध्ये मित्रपक्षांत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतेय. विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी आता इच्छुकांची भली मोठी गर्दी झाली (Pune Politics) आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जोरदार फील्डिंग सुरू केल्याचं देखील बोललं जातंय. पुण्यातील दोन नेते सुद्धा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार असल्याची माहिती मिळतेय.

36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा केल्याचं समोर आलंय. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सुद्धा मानकर यांनी संधी मिळावी, म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली (Maharashtra Politics) होती. त्यांची संधी डावलल्यानंतर मानकरांनी थेट राजीनामा दिला होता. परंतु त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी मानकरांची समजूत काढली होती. त्यामुळे यावेळी मानकरांना संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना सु्द्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातेय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी जगदीश मुळे यांना शब्द दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचा दाट अंदाज आहे. त्यामुळे आता पुण्याला दोन आमदार मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शास्त्रीय नृत्यांगना, मॉडेल… कोण आहे शिवश्री? भाजप खासदार तेजस्वी सूर्या विवाहबंधनात अडकले

तर दीपक मानकर म्हणाले की, मी विधान परिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केलाय. अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. काम करणाऱ्या माणसाच्या पक्ष हा उभा असतो. अजित पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असतो. त्यांनी संधी दिली नाही तरी मी अजित पवारांसोबतच राहणार, असं देखील दीपक मानकर यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us