शास्त्रीय नृत्यांगना, मॉडेल… कोण आहे शिवश्री? भाजप खासदार तेजस्वी सूर्या विवाहबंधनात अडकले

Who Is Singer Sivasri Skandaprasad Tejasvi Surya Wife : भाजपच्या (BJP) दिग्गज युवा नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी आज शास्त्रीय गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हे लग्न पार पडलं. लग्नाचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे पारंपारिक पोशाखात दिसत आहे. लग्नानंतर, बेंगळुरूमधील (bangalore) गायत्री विहार मैदानावर एक भव्य स्वागत समारंभ आयोजित केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. आपण तेजस्वी सूर्या यांनी पत्नी शिवश्री स्कंदप्रसाद नेमक्या कोण आहेत, ते जाणून घेऊ या.
शाळांची उन्हाळी सुट्टी कमी होणार; राज्यात एकाचवेळी परीक्षा, काय परिणाम होणार ?
खरं तर, लग्नात दक्षिण भारतीय परंपरा पूर्णपणे पाळल्या गेल्याचं दिसतं. याअंतर्गत ‘काशी यात्रा’, ‘जिरिगे बेला मुहूर्त’ आणि ‘लाजा होम’ यासारखे महत्त्वाचे विधी पूर्ण झाले. दक्षिण भारतीय लग्नांमध्ये ‘जीरीगे बेला’ हे शुभ काळाचे प्रतीक ( Who Is Singer Sivasri Skandaprasad) मानले जाते. तर ‘लाजा होम’ मध्ये वधू पवित्र अग्नीत तळलेले धान्य अर्पण करते. या पारंपारिक रीतिरिवाजांसह, दोघांनीही एकमेकांचे हात घेवून त्यांनी नवा प्रवास सुरू केलाय. हे जोडपं साधे अन् पारंपारिक वेशभुषेत दिसत होते.
शिवश्री स्कंदप्रसाद कोण आहेत?
शिवश्री स्कंदप्रसाद ही चेन्नई येथील एक प्रसिद्ध कर्नाटक गायिका आणि भरतनाट्यम कलाकार आहे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1996 रोजी झाला. शिवश्री मृदंगम वादक सीरकाझी श्री जे. स्कंदप्रसाद यांची कन्या (Tejasvi Surya Marriage) आहे. संगीत आणि नृत्याव्यतिरिक्त, ती एक स्वतंत्र मॉडेल आणि चित्रकार देखील आहे. तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झालं तर, तिने शास्त्र विद्यापीठातून बायो-इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजीमध्ये डिप्लोमा देखील केला आहे. याशिवाय तिने मद्रास विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.
‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले
या छायाचित्रांमध्ये शिवश्री स्कंदप्रसाद यांनी चमकदार पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी परिधान केलीय. जी तिने मांगटीका, सोन्याच्या बांगड्या, कानातले आणि पारंपारिक केशरचनाने पूर्ण केली आहे. तर तेजस्वी सूर्या सोनेरी आणि पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात दिसत होते. लग्नानंतर, या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे चाहते त्यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.