36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर…

Aditya Birla Education Trust Report Women Mental Health : महिलांच्या आरोग्यासंदर्भात (Womens Health) एक महत्वाची माहिती समोर आलीय. महिलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात एक अहवाल समोर आलाय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली (Women Mental Health Update) आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात आत्महत्या करणाऱ्या महिलांचं प्रमाण 36.6 टक्के आहे. यामध्ये 18 ते 39 या वयोगटातील तरूण महिलांचा जास्त समावेश (Health Update) आहे.
मोठी बातमी! डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी, राज्यातील आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
समाजामध्ये मानसिक आरोग्याबाबत असलेल्या भीतीमुळे महिला मदत घेण्यास नकार देतात. याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या एमपॉवरने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. ‘अनव्हीलिंग द सायलेंट स्ट्रगल’ असं या अहवालाचं नाव आहे. हा अहवाल देशातील 13 महिलांच्या मानसिक आरोग्याच्या आकडेवारीवर आधारित आहे. यामध्ये विद्यार्थिनी, कॉर्पोरेट व्यावसायिक, ग्रामीण महिला आणि सैन्यात कार्यरत महिलांचा समावेश आहे.
एमपॉवर द सेंटरच्या मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं की, महिला नातेसंबंधातील ताण, एकाकीपणा, नात्यातील आव्हाने आणि आर्थिक अस्थिरता यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. विशेष करून एकट्या माता मानसिक दबावाखाली आहेत. तर 50 टक्के महिला कामाचे संतुलन, आर्थिक दबाव आणि सामाजिक अपेक्षा या कारणांमुळे तणावाखाली आहेत. तर 47 टक्के महिलांना झोप न येण्याची समस्या असून 18 ते 35 वयोगटामधील महिलांचा यामध्ये समावेश आहे. 41 टक्के महिलांना भावनिकदृष्ट्या एकाकीपणा जाणवतोय. तर 38 टक्के विद्यार्थिनी आणि नोकरदार महिला या करिअर आणि आर्थिक स्थिरतेमुळे चिंतेत आहेत.
मुंबईची भाषा मराठीच, ती प्रत्येकांना शिकावी…; चौफेर टीकेंनंतर भय्याजी जोशींचा यू-टर्न
महाराष्ट्र शासनासोबतच्या ‘प्रोजेक्ट संवेदना’ अंतर्गत ग्रामीण महिलांवर अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये 12.8 लाख ग्रामीण महिलांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये असं समोर आलंय की, आर्थिक अस्थिरता, सामाजिक कलंक आणि मानसिक आरोग्य सेवांच्या कमतरतेमुळे या महिला नैराश्याने ग्रस्त आहेत. तसेच 42 टक्के महिला नैराश्य आणि चिंता तर 80 टक्के महिलांना मातृत्व रजा आणि करिअरमध्ये संघर्ष करावा लागतो. तर 90 टक्के महिला सांगतात की, मानसिक आरोग्यचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतोय. लैंगिक छळ, घरगुती हिंसा हे देखील यामागे मोठे कारणं आहेत.