मुंबईची भाषा मराठीच, ती प्रत्येकांना शिकावी…; चौफेर टीकेंनंतर भय्याजी जोशींचा यू-टर्न

Bhaiyyaji Joshi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी बुधवारी मुंबईची (Mumbai) कोणतीही एक भाषा नसल्याचे विधान करत घाटकोपरची भाषा ही गुजराती (Gujarati) असल्याची मुक्ताफळे उधळली होती. जोशींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय. दरम्यान, चौफेर टीकेनंतर जोशींनी यू-टर्न घेतला.
वेदांमध्ये गुरूत्वाकर्षणाचा उल्लेख, न्यूटन फार नंतर…; राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा दावा
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झालाय. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि प्रत्येकाला मराठी भाषा शिकली पाहिजे, असं जोशी म्हणाले.
आज माध्यमांशी बोलताना जोशी म्हणाले की, माझ्या कालच्या बोलण्यामुळे काही गैरसमज होत आहेत. मी विविध भाषांच्या सह अस्तित्वावर बोलत होतो त्यामुळे मी स्वतः स्पष्ट करू इच्छितो की, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच एक भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळं प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेऊनच मुंबईचे जीवन चालत आहे. स्वाभाविकच, आमची सर्वांची अपेक्षा असते की, बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असंच आम्हाला वाटतं, असं भय्याजी जोशी म्हणाले.
राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा, अधिकाऱ्यांची चौकशी करा, राजू शेट्टींची मागणी
जोशी नेमंक काय म्हणाले होते?
मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे, असं नाही असं वक्तव्य जोशींनी केलं होतं. विशेष म्हणजे, त्यांनी हे विधान मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासमोरचं केलं होतं. जोशी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली होती.