भय्याजी जोशी चिल्लर माणूस, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा…उद्धव ठाकरे संतापले

Uddhav Thackeray Against Bhaiyyaji Joshi : राज्यात मागील काही दिवसांपासून भाषा आणि जात यामुळे देखील मोठा वाद निर्माण होतोय. असंच एक भाषेसंबंधित वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलंय. यावर उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया समोर आली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी (Marathi) भाषा शिकली पाहिजे, असं नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापल्याचं पाहायला मिळतंय.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. ठाकरे म्हणाले की, सगळे लोकं छावा चित्रपटाला बघायला गेले नव्हते. काही अनाजी पंत गेले (Maharashtra Politics) नाही. अनाजी पंत याही काळात जन्माला आलेले आहेत. जसं काय आम्हीच सगळ्यांना ब्रह्मज्ञान शिकवलं आहे, असा भास करून काही लोक वावरत आहेत, असा टोला त्यांनी भय्याजी जोशी यांना लगावला आहे.
अशोक सराफ – वंदना गुप्ते पुन्हा रुपेरी पडद्यावर, “अशी ही जमवा जमवी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
ते म्हणाले की, काल भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन बरळून गेले. या लोकांनी ‘हिंदू-मुस्लिम’ असा वाद काढला नाही, तर आता ‘मराठी-मराठी’ असा वाद काढलेला आहे. त्यांना मी आव्हान करतो की, अशी गोष्ट कर्नाटकात तामिळनाडूमध्ये कर्नाटकात बंगालमध्ये जाऊन करून दाखवा. दक्षिण भारतात अशी भाषा करून सुखरूप घेऊन दाखवा. अनेक लोकांनी हा मुद्दा विधानभवनात विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे. भाषावर प्रांत रचना झाले, मुंबईची गल्ली रचना करत आहेत, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केलीय.
भय्याजी देखील चिल्लर माणूस असल्याचं जाहीर करावं, भय्याजीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केलीय. मराठी सक्तीचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. असं बोलल्यानंतर कारवाई केली, तर यांची पुन्हा हिम्मत होणार नाही. यांनी (मुख्यमंत्र्यांनी) कारवाई करावी. अन्यथा हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचं स्पष्ट होईल, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. भाजपचा (BJP) आणि संघाच्या कृती आहे की, त्या ठिकाणी पिल्लू सोडायचं आणि पिल्लू मोठे झाले की खांद्यावरती घ्यायचं. तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, म्हणजे काही उपकार केले नाहीत. मुंबई निर्मितीसाठी 280 लोकांनी बलिदान करून मुंबई मराठी माणसाने मिळवलेली आहे.
‘एप्रिल मे 99’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
संघाचं म्हणणं आहे की, जेव्हा कधी मुंबईवरती आपत्ती येते, तेव्हा आम्ही सर्व एकत्र मिळून पुढे येतो. आम्ही हिंदू म्हणून पुढे येतो, सगळ्यांना वाचवतो. पण हे लोक पुढे येतात आणि भेदभाव करतात आणि सगळ्यांना तोडतात, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
मुंबईमध्ये तुम्ही साखरेचा खडा देऊ शकत नसाल, तर मिठाचा खडा टाकू नका. अशा प्रकारच्या वृत्तींना सरकारने वेळीच ठोकले पाहिजे. भाजप ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ असा देश तोडायला निघालेला आहे. भाजपाला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे. यांचं संपूर्णपणे मुंबईतील बँकांवरती लक्ष आहे. मराठी माणसांना किंमत नाही, ही भडकवण्याची एक मांडणी आहे. म्हणून हे लोक मुंबई अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन तयार करत आहेत. आम्ही हे बोलून शांत बसणार नाही, तर आम्ही हुतात्मा चौकात जाऊन सर्व हुतात्म्यांना नमन करणार आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.