बारामतीत अजितदादांची वेगळी चाल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललं?

Pune Zilla Parishad Election: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतंय. पण बारामतीमध्ये अजितदादांना भाजपची माणसं जवळ केलीत.

Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar And Sharad Pawar

Pune Zilla Parishad Election : पुण्यात महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जोरदार संघर्ष झाला. भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) घेरलं होतं. अजितदादांना भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. पुण्यातील अकरा नगरपालिकांवर अजितदादांनी आपली सत्ता आणलीय. पण पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अजितदादांना खास यश मिळविता आले नाही. आता भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढतंय. पुणे जिल्हा परिषदही अजितदादांच्या ताब्यात राहिलेली आहे. झेडपीचा बालेकिल्ला भाजपला आपल्या ताब्यात घ्यायचाय. झेडपी भाजपच्या ताब्यात जावू नये म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतंय. पण बारामतीमध्ये अजितदादांना भाजपची माणसं जवळ कशी केलीत हेच पाहुया


दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार अनेक जिल्हा परिषद गट आणि गणात घड्याळ चिन्ह्यावर उमेदवार उभे केलेत. काही ठिकाणी मात्र घड्याळ चिन्हाला विरोध करत तुतारीवर निवडणूक लढविली पाहिजे, अशी मागणी झाली होती. आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्यामध्ये जोरदार संघर्ष आहेत. त्यामुळे देवदत्त निकमांनी घड्याळ चिन्हावर उमेदवार देण्यास विरोध दर्शविला. विरोधानंतर मोजक्याच ठिकाणी तुतारीवर उमेदवार असू शकतात. हे येत्या 27 जानेवारीला स्पष्ट होईल.


Pune Traffic : काय सांगता? 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाया गेले 152 तास


बारामती तालुक्यात अजितदादांची वेगळीच चाल?

भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. पण अजितदादांनी आपल्या बारामती मतदारसंघात वेगळी चाल खेळलीय. बारामती तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट असून, पंचायत समितीचे बारा गण आहेत. त्यातील दहा गणांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्ह्यावर निवडणूक लढवतायत. तर दोन गणामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवारच नाही. शिर्सुफळ गणात भाजप नेते बाळासाहेब गावडे यांचे चिरंजिव अनिकेत गावडे यांनी कमळाच्या चिन्हावर तर सुपे गणात उज्वला पोपट खैरे यांनीही कमळाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन्ही गणात राष्ट्रवादीने कोणत्याही उमेदवाराला अधिकृत एबी फॉर्मच दिला नाही. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने भाजपला बाय दिल्याची चर्चा आहे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार पुरस्कृत करेल, असं सांगितलं, जातंय, पण प्रत्यक्षात येथे घड्याळचे चिन्ह नसणार आहे.


Achalpur Politics : फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…


अजितदादांनी भाजपचे लोक जवळ केलेत ?

अजित पवार यांनी यंदा नवख्या उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे माणसं जवळ करण्याएेवजी अजितदादांनी भाजपचे माणसं जवळ केल्याचे दोन गणातील उमेदवारीवरून दिसून येतंय. तर दुसरीकडे नीरावागज गटात भाजपचे अभिजित देवकाते यांची पत्नी शिवानी या घड्याळावर निवडणुकीचे रिंगणात उतरविले आहेत. यावरून अजितदादांना शरद पवार यांचे माणसं जवळ करण्याएेवजी भाजपच्या लोकांवर प्रेम दाखवलंय. इतर तालुक्यामध्ये अजित पवार हे भाजपविरोधात दोन हात करणार आहेत. पण बारामतीमध्ये मात्र भाजपला अजितदादांनी बाय दिलाय. त्यामुळे अजितदादांना अजूनही भाजप लोक जवळची वाटतायत हे वरून दिसून येतंय.

Exit mobile version