Download App

कुणाच्याही गिधड धमक्यांना घाबरत नाही; नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Rahul Narvakar On Aaditya Thackeray : आमदारांमार्फत नाहीतर मतदारसंघात जाऊन काम करतो, त्यामुळे कुणाच्याही गिधड धमक्यांना घाबरत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांना लगावला आहे. राहुल नार्वेकरांनी घाबरुन दौरा रद्द केला असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. त्यावरुन राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना चांगलच सुनावलं आहे.

पालकमंत्रिपदाबाबत वाद नाहीतर चर्चा सुरु; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं

राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) म्हणाले, आमदारांमार्फत नाहीतर मतदारसंघात जाऊन काम करतो कुणाच्याही गिधड धमक्यांना घाबरत नाही.मी माझा दौरा 26 लाच रद्द केला होता, पण काही लोकांनी आपणच 28 तारखेला दौरा रद्द करायला लावला असल्याच्या चर्चा करुन केविलवाणा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूरमध्ये 24 तासांत 25 मृत्यू! महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूचे सत्र सुरुच

विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे पण अध्यक्ष तुमच्या गिधाड धमक्यांना घाबरत नाही, त्याचा काही फरक पडत नसल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

Raigad : स्थगिती उठली, निधीही मंजूर, कामे मार्गी : आदिती तटकरेंची मतदारसंघात जोरदार बॅटिंग

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरदरम्यान घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र सध्या राज्यात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर नार्वेकरांसमोरच सुनावणी सुरु आहे. मागील आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरामध्ये या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता.

राष्ट्रवादीच्या 6 अन् भाजपच्या 5 आमदारांवर शिंदेंचा ‘वाघ’ भारी; भुजबळांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चा सल्ला

अशातच नार्वेकर घानाला जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने नार्वेकर तारखांवर तारखा देत मुद्दाम हे प्रकरण लांबवत असल्याचंही आरोप केला होता. याचा साऱ्या पार्श्वभूमीवर अचानक नार्वेकरांनी घानाचा दौरा रद्द केला आहे. यासंदर्भातील बातमीचं कात्रण आदित्य ठाकरेंनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केलं होतं.

Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान झाले बेपत्ता

विधानभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय माझ्या ट्वीटनंतर घेतला. असं ट्विट आदित्य ठाकरेंनी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीत नार्वेकरांचा दौरा रद्द झाल्याची बातमी शेअर करत म्हटलं.

(नार्वेकर) येथील गद्दार आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी लांबवणीवर टाकून घाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय संसदीय परिषदेसाठी होते. यावरुन मी केवळं इतकं विचारलं होतं की महाराष्ट्रातील लोकशाहीचा गळा घोटून संसदीय परिषदेसाठी जाणं हा विरोधाभास नाही का?” असंही आदित्य ठाकरेंनी इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

Tags

follow us