पालकमंत्रिपदाबाबत वाद नाहीतर चर्चा सुरु; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं

पालकमंत्रिपदाबाबत वाद नाहीतर चर्चा सुरु; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं

Chagan Bhujbal : पालकमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये वाद नाहीतर चर्चा सुरु असल्याचं स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज पालकमंत्र्यांची घोषणा केल्यानंतर झाल्यानंतर छगन भुजबळांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.

भरत गोगावलेंची धास्ती; आदिती तटकरे वेटिंगवरच! रायगड अन् साताऱ्याचा तिढा कायम

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होते. मात्र पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देऊन चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’

मुख्यमंत्री शिंदे यांना जाहीर केलेल्या यादीनूसार नाशिक आणि रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री जाहीर केलेला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यात पालकमंत्री जाहीर केला नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यावरुन छगन भुजबळ म्हणाले, आमच्या शिंदे गटाने भाजसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे.

Mumbai News : ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क मगर; कर्मचाऱ्यांची सतर्कता आली कामी

अजित पवार गट नंतर सत्तेत सामिल झाले आहेत. त्यामुळे अगोदर जे लोकं गेली आहेत त्यांची समजूत काढणं त्यांच्या जागेवर नियुक्ती करणं यात थोडा वेळ जातोयं. मी पालकमंत्रीपदाच्या चर्चेत नाही. पालकमंत्रीबाबत वाद नाही तर चर्चा सुरु आहे, सामंजस्यातून मार्ग काढणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

हाफकिनकडून खरेदी बंद; रुग्णांसाठी औषधांचा आभाव : 24 जणांच्या मृत्यूनंतर अधिष्ठात्यांची संतापजनक माहिती

पालकमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज नव्हते, नाशिक आणि रायगडमध्ये आमचेच आमदार खासदार आहेत त्यामुळे चर्चेतून तिढा सुटेल तेव्हा सुटेल, असंही ते म्हणाले आहेत. मागील 35 वर्षांपासून मी ओबीसींसाठी भांडतोयं, याआधीही मी ओबीसीसाठी भांडत होतो, त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावू नये, असा टोला त्यांनी जिंतेंद्र आव्हाडांना लगावला आहे.

दरम्यान, जातिनिहाय जनगणनेची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत, आपल्या राज्यात ओबीसी समाजाची किती लोकसंख्या आहे हे स्पष्ट झालं पाहिजे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube