रायगडच्या पालकमंत्रिपदी अखेर गोगावले; शिंदेंच्या शिलेदाराने तटकरेंना शह दिला की राजकीय डील ?

Sunil Tatkare: विधानसभेच्या निवडणुकीनंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.

Bharat Gogawale

Bharat Gogawale

Raigad Guardian Minister Post : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झाला. रायगडमध्ये शिवसेनेची ताकद असल्याने गोगावले यांनी पालकमंत्रिपदाचा दावा सोडला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी आग्रही होते. शेवटी बाजी गोगावले यांनी मारली. पण चर्चा मात्र विधानपरिषदेच्या राजकीय डीलची आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यातून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर गोगावले यांनी रायगडच्या मंत्रिपदावर दावा सांगितला होता. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे या इच्छुक होत्या. तर नाशिकच्या पालमंत्रिपदावर भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा सांगितला होता. अखेर दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यास महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची गोगावले यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. तर नाशिकचे पालकमंत्रिपदही भाजपला गेले असून, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पालकमंत्री असणार आहे.


राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक; ट्रॅफिक, रस्ते आणि पेपरफुटीचे मुद्दे चर्चेत


विधानपरिषदेची डील गोगावलेंच्या पथ्थ्यावर

पालकमंत्रिपदावरून गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये खटके उडाले होते. एकमेंकावर थेट टीका केली जात होती. नगरपालिका, झेडपी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष उडाला होता. महायुतीमधील दोन्ही पक्ष काही ठिकाणी एकमेंकाविरुद्ध लढले होते. परंतु शिवसेना व राष्ट्रवादीमधील वाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीला मिटला होता. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले होते. तटकरे यांना शिवसेना विरोध करेल, असे वाटत होते. आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली होती. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर दळवी यांनी माघार घेतली होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीतच गोगावले यांनी पालकमंत्रिपदाचा शब्द महायुतीमधील नेत्यांकडून घेतला होता. तो शब्द महायुतीमधील नेत्यांनी पाळत गोगावले यांना पालकमंत्री केले आहे.

एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांनी आणला ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’


दोघांमधील वाद मिटणार का ?

गोगावले हे पालकमंत्री झालेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदारांना आनंद झालेला आहे. पालकमंत्री आपला असल्याने निधी वाटपात झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेच्या आमदारांना असणार आहे. निधी वाटपावरून भविष्यात गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये खटके उडू शकतात, असे स्थानिक पत्रकारांचे मत आहे.

Exit mobile version