Download App

शरद पवारांनीच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज्यात सर्वात आधी फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी (Sharad Pawar) केल्याची टीका राज ठाकरेंनी केली.

Raj Thackeray On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्य (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका करत आहे. आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एका प्रचार सभेत बोलताना शरद पवारांवर घणाघाती टीका केली. राज्यात सर्वात आधी फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी (Sharad Pawar) केल्याची टीका राज ठाकरेंनी केली.

सुषमा अंधारेंचा बाळासाहेबांबाबतचा जुना ‘तो’ व्हिडिओ लावत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर तुटून पडले ! 

कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे राज ठाकरेंची सभा झाली. या सभेला संबोधित करतांना राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात सध्या कोण कोणासोबत आहे, हेच समजत नाही. मला फोडाफोडीचे राजकारण कधीही मान्य नाही आणि ते होणार पण नाही. आता जे बोलतात आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला त्यांनी जरा एकमेकांकडे पाहावं. उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले होते, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

इंडिया आघाडी म्हणजे खिचडी, ते संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील; फडणीसांचा टोला 

उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. तेव्हा त्यांना काही नाही वाटले. त्यांच्यासोबत शरद पवार बसले आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणी सुरूवात केली असेल तर शरद पवारांनी केली. त्यांनी आधी कॉंग्रेस फोडली आणि मग पुलोद स्थापन केलं. 1991 मध्ये पुन्हा छगन भुजबळांचा फितवून पवारांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली होती, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरे म्हणाले, यानंतर नारायण राणेंना बरोबर घेत कॉंग्रेसने पन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. त्यावेळी आजचे फोडाफोडीचे राजकारणावर टाहो फोडणारे नेतृत्व कुठे दिसत नव्हते, असा टोलाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

यावेळी राज ठाकरेंनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये अंधारे हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत होत्या. त्याच संदर्भाने बोलतांना राज ठाकरे म्हणाले, वडील चोरले, चोरले म्हणता ना, मग ज्या वडिलांवर एवढं प्रेम होतं, त्या बाळासाहेबांबद्दल या बाई ७०-८० वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिल्यावर हात लटलटणार, असं म्हणत होत्या. त्याच बाईला तुम्ही प्रवक्ते करता आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे असं कसं सागंता? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

 

follow us

वेब स्टोरीज