Raj Thackeray MNS Gudipadwa : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात अपेक्षाप्रमाणे महायुतीला पाठिंबा दिलाय. शिवसेना, राष्ट्रवादीला नव्हे तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी मनसे आपला पक्ष असून, तोच वाढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण ते लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी माघार घेतली आहे. पण या निवडणुकीची रसद मात्र आता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी राहणार आहे. महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी त्यामागे भविष्यातील राजकारण आहे. ते जाणून घेऊ…
सारे मिळून…, राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा अन् काही मिनिटांत फडणवीसांचे खास ट्वीट
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. पण याचबरोबर मनसे सैनिकांना राज ठाकरे यांनी एक आदेशही दिला आहे. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचं आहे की, विधानसभेच्या तयारीला लागा.. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा.. पुढच्या गोष्टी पुढे.. आता कसलाही विचार न करता आपण पक्ष बांधणीचा विचार केला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्रभर भेटण्यासाठी लवकरच आपल्यासोबत येतो असे राज ठाकरेंची गर्जना आहे. याचा अर्थ महायुतीच्या सभांमध्ये राज ठाकरे व त्यांचे शिलेदार दिसू शकतात. त्यामुळे लोकसभेच्या मैदानात नसलेल्या मनसे सैनिकांना बळ मिळू शकते. त्याचा फायदा लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या पाच-सहा महिन्यावर असलेल्या विधानसभेला मिळू शकतो, असे पक्के गणित राज ठाकरे यांच्या डोक्यात असणार आहे. तसेही राज ठाकरे यांचे इंजिन लोकसभा निवडणुकीसाठी तयार नव्हते. सर्वचस्तरावर शांतता होती.
Rajkummar Rao च्या ‘श्रीकांत’चा ट्रेलर आऊट; प्रेक्षकांसाठी एक अनोखी पर्वणी!
मनसे या पक्षाचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. ते कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तसे कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेची काहीशी ताकद आहे. पुण्यामध्ये थोडीफार ताकद आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नक्की होणार आहे. राज ठाकरेंचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्यास विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. सध्या राज्याच्या राजकारणात एक पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार देऊन निवडून आणू शकत नाही. तशी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती नाही. राज्यात या पुढेही आघाडी आणि युतीचेच राजकारण होणार आहे. मोजकी मोठी शहरे सोडली तर इतर शहरे व ग्रामीण भागात मनसेची ताकद आता नाही. बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. स्वतंत्र लढून मनसेला फायदा होत नाही. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीमध्ये येऊन आपले काही आमदार निवडून आणतील. त्याचा फायदा भविष्यात पक्ष वाढविण्यासाठी होईल. तर मुंबई व इतर महानगरपालिकेच्या निवडणुकाही होणार आहे. त्यातही मनसेला फायदा मिळू शकतो. त्यामुळे महायुतीला आता पाठिंबा देऊन भविष्यात पक्षाला उभारी देण्याचे मनसुबे राज ठाकरे यांचे आहे. आता ते कसे यशस्वी होतात ते भविष्यातच समजणार आहे.
राज ठाकरेंचा धोका कुणाला ?
लोकसभेच्या जागा वाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना म्हणावा तशा जागा मिळत नाही. एकनाथ शिंदे यांच्या सेनेला आतापर्यंत दहा जागा मिळाला आहेत. त्यात रामटेक, यवतमाळ येथील विद्यमान खासदारांना तिकीट कापावे लागले. शिंदेंवर तसा दबाव भाजपकडून टाकण्यात आल्याचे बोलले जाते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत केवळ रायगड, बारामती, धाराशिव आणि शिरुर या चारच जागा मिळालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पवार, शिंदे यांची ताकद किती आहे हे दिसून येईल. त्यात विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे महायुतीबरोबर असल्यास त्यांना ही काही जागा द्यावा लागतील. त्यात एकनाथ शिंदे यांची ताकद असलेल्या ठाणे, कल्याण, नाशिकमधून मनसे जास्त जागा मागू शकते. कारण या भागात एकीकाळी मनसेला भरभरून ताकद मिळालेली आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांचा करिश्मा न दिसल्यास भाजपचा राज ठाकरेंना अधिक बळ देऊ शकते. त्यातून भाजपलाही फायदा होईल.