सारे मिळून…, राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा अन् काही मिनिटांत फडणवीसांचे खास ट्वीट
Devendra Fadanvis Welcome to Raj Thackeray : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) ट्विट करत त्यांचे आभार मानले आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं.
‘उद्धव ठाकरे रोकड पक्षाचे अध्यक्ष’; ‘मोदी भेकड’ म्हणणाऱ्या ठाकरेंवर शिंदेंचा पलटवार
या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले की, सस्नेह स्वागत ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! असं म्हणत फडणवीसांनी राज यांचं स्वागत केलं आहे.
सस्नेह स्वागत !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत,
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत…— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2024
तर आपली ही भूमिका जाहीर करताना राज ठाकरे म्हणाले की, पुढच्या पाच वर्षांचा विचार करता. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की, मला कोणत्याही वाटाघाटी नको. मी त्यांना सांगितलं की, मला राज्यसभा ही नको विधानपरीषद ही नको. पण या देशाला चांगल्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष राज्यातील महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले.
Rajkummar Rao च्या ‘श्रीकांत’चा ट्रेलर आऊट; प्रेक्षकांसाठी एक अनोखी पर्वणी!
मी मनसेचाच अध्यक्ष राहणारः राज ठाकरे
तसेच यावेळी मी कोणत्याही शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच (MNS) अध्यक्ष राहणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठासून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक अफवांना ऊत आला होता. राज ठाकरे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.