‘उद्धव ठाकरे रोकड पक्षाचे अध्यक्ष’; ‘मोदी भेकड’ म्हणणाऱ्या ठाकरेंवर शिंदेंचा पलटवार

‘उद्धव ठाकरे रोकड पक्षाचे अध्यक्ष’; ‘मोदी भेकड’ म्हणणाऱ्या ठाकरेंवर शिंदेंचा पलटवार

Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) रोकड पक्षाचे अध्यक्ष असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, पाडव्याच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा भेकड असा उल्लेख करीत सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदींचा भेकड असा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही ठाकरेंचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

Ajit Pawar : आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या; सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून आमच्या सेनेचा ‘चायनीज सेना’ असा उल्लेख करण्यात आला आहे. आमची चायनीज सेना आहे तर मग त्यांची उद्धव ठाकरेंची उठा-बसा सेना आहे का? ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसप्रणित आहे. मित्र पक्षाच्या पाठित खंजीर खुपसून उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवलं, स्वाभिमानासाठी आम्ही बंड केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपला महाराष्ट्र टफ! भाजपाचा ‘रिव्हर्स’ गिअर, तर ‘मविआ’त ‘फिलगुड’; नव्या अहवालात काय?

तसेच भेकड भाकड बोलणं हा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही. कोविड काळात जगभरातले लोकं मोदींना मदत मागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात पीपीई कीट, लस पोहोचवली आहे. अनेकांचे प्राण मोदींनी वाचवले आहेत. आरोप करणारे घरात बसून कोणती शूरता दाखवत होते. बाहेर लोकं मरत होते अन् हे घरात बसून रोकड मोजत होते. मी त्यांना रोकड पक्षाचे अध्यक्ष म्हणू का? हे योग्य ठरेल का? रोकड मोजणाऱ्यांना मोदींना भेकड म्हणण्याचा अधिकार नाही, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेनाप्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड, भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. नरेंद्र मोदींचे कालच्या सभेतील भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचे होते. कारण ते अध्यक्षही नाहीत. आता आम्ही सुद्धा यापुढे उत्तर देऊ कृपा करून ते पंतप्रधानांना दिले असे कुणीही समजू नका. आमचे जे विरोधक आहेत त्यात एक भेकड जनता पक्षही आहे. देशातील तपास यंत्रणांचा वापर करून देशभक्त पक्षांना त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. यांच्यात ताकद नाही म्हणून मी ह्यांना भेकड म्हणतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube