Raj Thackeray News : डॉक्टर आणि नर्सेसने निवडणुकीच्या ड्युटीवर जाऊ नये, तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटीला जुंपण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन राज ठाकरे यांना जाहीर सभेतच भाष्य करीत इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट
राज ठाकरे म्हणाले, डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का? नर्सेस मतदारांची डायपर बदलणार? ज्यासाठी त्यांची नेमणूक केलीय, ज्या रुग्णांसाठी त्यांची नेमणूक केली, तिथे ते नसावेत का? निवडणुका होणार आहेत ही गोष्ट निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळेला माहिती असते. त्यामुळे एक फळी का उभी नाही करत तुम्ही? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
इम्रान खानची शाही बडदास्त! दर महिन्याला 12 लाखांचा खर्च, तुरुंगात स्पेशल ट्रिटमेंट
तसेच प्रत्येक वेळेला शालेय शिक्षक, नर्सेसची नेमणूक करायची. आता डॉक्टर्स घ्यायचे हे काय चाललंय. मी तुम्हाला आताच ज्या डॉक्टर आणि नर्सेसवर ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल, तिथे त्यांनी जाऊ नये. ज्या रुग्णांची सेवा तुम्ही करताय तिथे तुम्ही जा, काम करा, तुम्हाला कोण काढतं ते मी बघतो, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा
मी जन्माला घातलेल्या मनसेचाच अध्यक्ष…
मी दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला गेलो, तेव्हापासूनच चक्र सुरु झालं. मी दिल्लीला शाहांच्या भेटीला गेलो हे विरोधकांना कसं कळलं? मला तिथं 12 थांबण्याची वेळ आली नाहीतर माझी भेट ही दुसऱ्या दिवशी होती, मी आदल्या दिवशीच दिल्लीत पोहोचलो होतो. माध्यमांमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे बातम्या चालवण्याचं काम सुरु असतं. दिल्लीतही पत्रकारांना सांगितलं की मला निवडणूक लढवायची असेल तर मी सांगूनच लढवणार आहे. मला जर शिवसेनेचा अध्यक्ष व्हायचं असतं तर तेव्हाच झालो नसतो का? मी बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी जन्माला घातलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी ठासून सांगितलं आहे.