Download App

Ram Satpute On Jitendra Awhad : ‘मुंब्र्याच्या बाहेर पडल्यास हिंदू समाज कळेल’, सातपुते व आव्हाडांमध्ये रंगले ट्विटर वॉर

राष्ट्रावदी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad )  व भाजपचे ( BJP ) आमदार राम सातपुते ( Ram Satpute )  यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले आहे. आव्हाडांनी ट्विट करत राम सातपुते यांचा वैचारीक गोंधळ झाल्याचे बोलले आहे. सातपुते यांनी देखील आव्हाडांना सुनावले आहे. या दोन्ही नेत्यांनी ट्विट करत एकमेकांवर निशाणा साधला आहे.

ज्या व्यवस्थेने माझ्या आजोबांना हमाली करायला लावली व त्यांच्या वडिलांना चप्पल शिवायला लावली,  त्या व्यवस्थेच्या बाजूने उभे राहणे म्हणजे वैचारीक गोंधळ झाल्याचे लक्षण आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. यावरुन सातपुतेंनी देखील आव्हाडंवर निशाणा साधला आहे.

तर तुम्ही हिंदुद्वेषामुळे हिंदू समाजात आज अस्तित्वात नसलेल्या अनिष्ट रूढी परंपरा बद्दल बोलत आहात. कधी तरी मुंब्र्याच्या बाहेर पडा म्हणजे तुम्हाला जरा हिंदू समाजाच दर्शन होईल, अशा शब्दात सातपुते यांनी आव्हाडांना सुनावले आहे.

दोन दिवसांपूर्वी विधानभेच्या अधिवेशनामध्ये आव्हाड व सातपुते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. माझ्या जातीचा उल्लेख करत माझा हीनतेने उल्लेख केल्याचा आरोप सातपुतेंनी आव्हांडावर केला होता. तर यावेळी बोलताना सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता.

यावरुन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जोरदार आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारे कोणत्याही नेत्याचा अवमान सहन केला जाणार नाही, असे म्हटले होते. यानंतर राम सातपुते यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती.

Tags

follow us