Download App

शिंदेंची कडवी झुंज अपयशी; मात्र, पवारांना घाम फोडला…

  • Written By: Last Updated:

Ram Shinde Tough Fight To Rohit Pawar In Karjat Jamkhed : राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या, निकाल देखील जाहीर झालेत. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले, तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या. राज्यात अशाच एका लढतीची चांगलीच चर्चा झाली, ती म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील लढत होय. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार तसेच माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये टफ फाईट झाली. शेवटपर्यंत श्वास रोखून ठेवणारी लढत या ठिकाणी पार पडली. मात्र, युवा आमदार रोहित पवार या ठिकाणी विजयी झाले. माजी मंत्री राम शिंदे हे पराभूत झाले. ते या निवडणुकीत शेवट्पर्यंत पवार यांना संघर्ष करण्यास कारणीभूत ठरले. शिंदे हारले, मात्र त्यांनी पवार यांना अक्षरशः घाम फोडला. अवघ्या काही मतांनी रोहित पवार यांना निसटता विजय मिळवता आला.

महाराष्ट्रातील कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघावरील निवडणूक शेवटपर्यंत रंजक राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळाली. सुरुवातीचे कल समोर आले, तेव्हा पवार यांनी आघाडी घेतली होती. मात्र, जसजश्या मत पेट्या उघडल्या गेल्या. त्यानंतर शिंदे यांनी आघाडी घेत पवारांना पिछाडीवर पाडले. मात्र निकाल अंतिम टप्याकडे वाटचाल करू लागला दोघांमध्ये देखील टफ फाईट झाली. निकालाच्या अंतिमतः रोहित पवार यांना एकूण 1,27,676 मते मिळाली, तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली व पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला.

नगर जिल्ह्यातून ‘या’ आमदारांची नावे मंत्रिपदासाठी…वाचा सविस्तर

भूमिपुत्र विरुद्ध बारामतीचे पार्सल

कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे गाजले. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच रोहित पवार यांचे शिलेदार टप्प्याटप्प्याने त्यांना सोडून राम शिंदे यांच्यासोबत गेले. तर भाजपला धक्का देत काहींनी रोहित पवार यांच्या गटात सामील होत राम शिंदेंना धक्का दिला. दरम्यान या निवडणुकीत बाहेरील उमेदवार, बारामतीचे पार्सल, युवराज पुत्र, भूमिपुत्र अशा टॅगलाईनने हो निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरली. या मतदारसंघाची निवडणूक पवार आणि शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली.

पवार यांना विजयाच्या गुलालापासून रोखण्यासाठी भाजपने 2019 प्रमाणे पुन्हा एकदा भाजपचे एकनिष्ठ ओळख असलेले माजी मंत्री राम शिंदे यांना मैदानात उतरविले. ‘भूमीपुत्र विरुद्ध बारामतीचे पार्सल’ अशी ही लढत झाली. शिंदे यांनी देखील विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद लावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे यांनी ताकद पणाला लावली होती. मात्र, जातीय समीकरणावर झालेल्या या निवडणुकीमध्ये शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे यांनी स्पष्टच सांगितलं…

शिंदेंची कडवी झुंज ठरली अपयशी

2019 च्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुक राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यामध्ये झाली होती. येथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच लढत झाली होती. गेल्या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मते मिळाली, तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मते मिळाली. यामुळे गेल्या निवडणुकीत 43 हजार 347 इतके मताधिक्य घेत पवार विजयी झाले होते. मात्र 2024 च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना एक लाख 27 हजार 676 मते मिळाली तर शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 इतके मते मिळाली होती व शिंदे यांचा फक्त 1243 मतांनी पराभव झाला. यामुळे कोठेतरी शिंदे यांनी कडवी झुंज दिली मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

 

follow us