नगर जिल्ह्यातून ‘या’ आमदारांची नावे मंत्रिपदासाठी…वाचा सविस्तर
Ahilyanagar District For Ministerial Posts : राज्यात लोकसभा निवडणुकांनंतर (Assembly Election 2024) पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला चांगले घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात अजित दादांच्या शिलेदारांनी विजयचा गुलाल उधळला, तर भाजपचे कमळ देखील या ठिकाणी फुलले आहे. यामुळे आघाडीला धक्का देत महायुतीने विजयला गवसणी (ministerial posts) घातली. निकालानंतर आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे, ती म्हणजे नगर जिल्ह्यात कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार. यामध्येच आता काही नवे समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एक नाव फिक्स आहे, ते म्हणजे या निवडणुकींमधील किंगमेकर राधाकृष्ण विखे पाटील हे होय. मात्र त्यांच्या पाठोपाठ कोणाला मंत्रिपद मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता राज्यातील जनतेला वेध लागले आहे की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळामध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याबाबतीत नवनिर्वाचित आमदारांसोबतच आता मतदार राजांना देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात महायुतीला मिळालेलं यश पाहता अहिल्यानगर जिल्ह्यात यावेळी मंत्रिपद नक्कीच मिळणार हे निश्चित आहे, असं बोलले जात आहे. परंतु ते कुणाला मिळणार, याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सध्या नगर जिल्ह्याचे एकंदरीत चित्र बघितले तर या ठिकाणहून भाजपच्या दोघांना तर अजित पवार गटातील दोघांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सध्या रंगली जात आहे.
मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे यांनी स्पष्टच सांगितलं…
मंत्रिपदासाठी ‘ही’ नावे आहे चर्चेत
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात विखे पॅटर्न यशस्वी ठरला. आमदार राधाकृष्ण विखे हे किंगमेकर ठरले असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार असे बोलले जात आहे. विखे हे सलग 8 वेळा निवडून आले असून ते ज्येष्ठ नेते असून जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार ते ठरले आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते म्हणजे शिवाजीराव कर्डिले हे आहे. तसेच तिसरे नाव हे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेल्या मोनिका राजळे यांचे आहे. जिल्ह्यातून त्या एकमेव महिला आमदार असून त्यांचा देखील मंत्रिपदासाठी भाजप विचार करेल अशी एक शक्यता आहे.
अजित पवारांच्या कटाचा मी बळी ठरलो; भाजपने गांभिर्यानं घ्यावं, राम शिंदेंनी सांगितलं पराभवाचं कारण
त्याचबरोबर अगदी निसटत्या पराभवाचा सामना कराव्या लागणारे माजी मंत्री राम शिंदे यांच्या देखील नावाची चर्चा आहे. भाजपाबरोबरच जिल्ह्यात अजित दादांचे चार शिलेदार आमदार म्हंणून निवडून आले. मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale)यांचेच नाव देखील चर्चेत आहे. तर नगर शहर मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप हे देखील तिसऱ्यांदा विधानसभेवर पोहोचले आहे. यामुळे त्यांना देखील मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. प्रचारांच्या पोस्टरवर तसेच कार्यकर्त्यांकडून प्रचारात लाल दिवा, भावी मंत्री अशा आशयाची फलक नगर शहरात झळकले आहेत. मात्र कोणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.
आघाडीचा सुपडासाफ तर महायुतीला घवघवीत यश
विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडासाफ झालेला पाहायला मिळाला. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत स्थिती बघितली, तर त्या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल 10 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तर या 10 पैकी चार 4 भाजप तसेच अजित पवार गटाला देखील 4 आणि शिंदे सेनेला 2 अशा एकूण दहा जागांचा यामध्ये समावेश आहे. तर आघाडीला कोवेल दोन जागांवर यश मिळवता आले आहे. यामध्ये कर्जत जामखेड आणि श्रीरामपूर या आहेत.