Download App

‘…तर आज शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंचं मोठं विधान

शरद पवार महायुतीसोबत असते तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही ती वेळे गेलेली नाही. त्यांचे स्वागतच आहे. - रामदास आठवले

Ramdas Athawale : शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मोठं वक्तव्य केलं. शरद पवार महायुतीसोबत (Mahayuti) असते तर ते आज राष्ट्रपती झाले असते. आताही त्यांचे स्वागतच आहे, असं विधान आठवले यांनी केलं.

व्यापाऱ्यांनो, धमकीला भीक घालू नका, आम्ही संरक्षण देणार; CM फडणवीसांचा दिलासा 

रामदास आठवले गुरुवारी जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, याविषयी विचारले असता ते म्हणाले, शरद पवारांसारखा माणूस आमच्यासोबत आला असता तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून, देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले असते. कदाचित ते राष्ट्रपतीही झाले असते. अजूनही ती वेळ गेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आणि त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवारांचे स्वागतच आहे, असं आठवले म्हणाले.

‘कायर समझा था क्या? फायर हूं मैं…; पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न, तरीही राहुल गांधींनी केलं भाषण 

पुढं ते म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते. ते आजही एकत्रच आहेत. अजित पवारांचे एकच म्हणणे होते की, तुम्हाला शिवसेना चालते, तर मग भाजप का चालत नाही?, असं आठवले म्हणाले.

..तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल
रामदास आठवलेंनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे व राज ठाकरे आणि शरद पवार व अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांनाही एकत्र यावं लागेल. पण मला वाटतं की, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत. आले तरी त्यामुळं महाविकास आघाडीत फूट पडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला मिळेल. या दोघा भावांना एकत्र यायचे असेल तर यावे. पण, त्यामुळं  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असं आठवले म्हणाले.

ट्रम्प यांची मध्यस्थी नको…
यावेळी आठवलेंनी भारत-पाकिस्तान वादात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी जोरदारपणे फेटाळून लावली. पाक हा अतिरेक्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आदर आहे. पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आलेच पाहिजे. त्यासाठी युध्द केलं पाहिजे. वेळ आली तर पाकलाही ताब्यात घेतले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला ट्रम्प किंवा इतर कोणत्याही नेत्याची मध्यस्थी नको आहे. जर पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या आणि आम्हाला पीओके दिला तर भारत थेट पाकशी चर्चा करण्यास तयार आहे, यामुळं युद्धाची गरजच भासणार नाही, असं ते म्हणाले.

follow us