Download App

… तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल

अहिल्यानगर : राज्यामध्ये सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना एकत्र यावे लागेल,असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे.

तुर्कीला आणखी एक दणका! तुर्किश कलाकारांना बॉलीवूडचे दरवाजे बंद; शुटिंगही थांबणार 

रामदास आठवले आज शिर्डीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी आठवलेंनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे व राज ठाकरे आणि शरद पवार व अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांनाही एकत्र यावं लागेल. पण मला वाटतं की, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत.  ते दोघे एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला मिळेल. या दोघा भावांना एकत्र यायचे असेल तर यावे. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असं आठवले म्हणाले.

व्यापाऱ्यांनो, धमकीला भीक घालू नका, आम्ही संरक्षण देणार; CM फडणवीसांचा दिलासा 

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, याविषयी विचारले असता आठवले म्हणाले, शरद पवारांसारखा माणूस आमच्यासोबत आला असता तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून, देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले असते. कदाचित ते राष्ट्रपतीही झाले असते. अजूनही ती वेळ गेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आणि त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवारांचे स्वागतच आहे, असं आठवले म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात पाहिजे…
यावेळी आठवलेंनी भारत-पाकिस्तान वादात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी जोरदारपणे फेटाळून लावली. पाक हा अतिरेक्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आदर आहे. पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आलेच पाहिजे. त्यासाठी युध्द केलं पाहिजे. वेळ आली तर पाकलाही ताब्यात घेतले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला ट्रम्प किंवा इतर कोणत्याही नेत्याची मध्यस्थी नको आहे. जर पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या आणि आम्हाला पीओके दिला तर भारत थेट पाकशी चर्चा करण्यास तयार आहे, यामुळं युद्धाची गरजच भासणार नाही, असं ते म्हणाले.

follow us