Download App

रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंना धक्का; जात पडताळणी समितीकडून जातीचा दाखला रद्द

Rashmi Barve : रामटेकच्या काँग्रेसच्या (Ramtek Loksabha) उमेदवारी रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना जात पडताळणी समितीकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बर्वे यांचा जातीचा दाखला रद्द ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

रामटेक मतदारसंघातून बौद्ध समाजाचा उमेदवार काँग्रेसकडून देण्यात आला नसल्याने बौद्ध समाजातून नाराजीचा सूर दिसून येत होता. अशातच रामटेकमधून किशोर गजभिये हे काँग्रेसच्या तिकीटावरुन इच्छूक होते.. उमेदवारी दाखल करण्याबाबत बोलतांना किशोर गजभिये म्हणाले की, “रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्राच्या वादामुळे रद्द होण्याची दाट शक्यता असून, पक्षाने पहिला ए.बी फॉर्म रश्मी बर्वे यांना द्यावा. मात्र, दुसरा ए.बी फॉर्म मला द्यावा. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर किमान माझ्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार रामटेकच्या मैदानात राहील” असा तर्क किशोर गजभिये यांनी मांडला होता. अखेर रश्मी बर्वे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांचा जातीचा दाखल रद्द ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर एक मोठा पेच तयार झाला आहे.

follow us