18+18+9+3 – सूत्र ठरले, शिलेदारही हेरले… पहा महाविकास आघाडीची संभाव्य समीकरणे

Soniya Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar

आघाडी-युतीमध्ये निवडणूक लढवताना सर्वात कळीचा मुद्दा ठरणारी गोष्ट म्हणजे जागा वाटप. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटते. त्यानंतर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिथून उमेदवार कोण असणार? तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सृदृढ असावा, नेता म्हणून ओळखला जावा, लोकसंपर्क असावा आणि सर्वात महत्वाचे निवडून येण्याची क्षमता असणारा हवा असे अनेक निकष उमेदवार ठरविताना लावले जातात. या चाळणीतून जो राहिल तो उमेदवार मैदानात उतरतो. तिथून पुढे सुरु होते प्रचार अन् मतदानाची लढाई. थोडक्यात अर्धी लढाई ही जागा वाटप अन् उमेदवार निश्चिती यातच असते.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी हीच अर्धी लढाई सध्या तरी महाविकास आघाडीने जिंकल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी त्यांच्या जागा वाटपाचा मुद्दा जवळपास मार्गी लावला आहे. याशिवाय त्यांचे उमेदवारही अंतिम झाल्याचे बोलले जाते. जागा वाटपाची आणि संभाव्य उमेदवारांची हीच याची लेट्सअप मराठीच्या हाती लागली आहे. (Lok Sabha seat allocation issue of Mahavikas Aghadi is almost over)

पाहुयात कोणती जागा कोणाकडे असणार आणि तिथून संभाव्य उमेदवार कोण असू शकतो…

महाविकास आघाडीत काँग्रेस 19 जागा लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचीही याची समोर आली आहे. 

  • रामटेक – माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, नागपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा तक्षशिला वागधरे
  • हिंगोली – जिल्हा प्रभारी सचिन नाईक
  • अमरावती – आमदार बळवंत वानखेडे किंवा मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार राहुल गडपाले
  • भंडारा – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
  • चंद्रपूर – आमदार प्रतिभा धानोरकर किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस
  • गडचिरोली – महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते
  • नांदेड – शेकापच्या महिला अध्यक्षा आशा शिंदे यांना आयात करुन
  • धुळे – नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर
  • नंदुरबार – आमदार के. सी. पाडवी
  • पुणे – आमदार रवींद्र धंगेकर
  • सोलापूर – आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस
  • सांगली – माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील
  • भिवंडी – ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे
  • वर्धा – माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांचे पुत्र आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष समीर देशमुख
  • नागपूर – आमदार अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार, माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल गुडधे
  • कोल्हापूर – शाहु महाराज छत्रपती
  • लातूर – अद्याप उमेदवाराचे नाव ठरलेले नाही.
  • मुंबई उत्तर मध्य – अद्याप उमेदवाराचे नाव ठरलेले नाही.
  • मुंबई उत्तर – अद्याप उमेदवाराचे नाव ठरलेले नाही.

महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 18 जागा लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचीही याची समोर आली आहे. 

  • बुलढाणा – जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ-वाशीम – माजी मंत्री संजय देशमुख
  • परभणी – विद्यमान खासदार संजय जाधव
  • जालना – माजी आमदार शिवाजीराव चोथे
  • छत्रपती संभाजीनगर – माजी खासदार चंद्रकांत खैरे
  • नाशिक – माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर
  • पालघर – जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी
  • कल्याण – महिला नेत्या सुषमा अंधारे
  • ठाणे – विद्यमान खासदार राजन विचारे
  • मुंबई उत्तर पश्चिम – विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर
  • मुंबई दक्षिण – विद्यमान खासदार अरविंद सावंत
  • मुंबई उत्तर पूर्व – माजी खासदार संजय दिना पाटील
  • मुंबई दक्षिण मध्य – माजी खासदार अनिल देसाई
  • रायगड – माजी खासदार अनंत गिते
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विद्यमान खासदार विनायक राऊत
  • मावळ – माजी महापौर संजोग वाघेरे
  • शिर्डी – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे
  • धाराशिव – विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नऊ जागा लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचीही याची समोर आली आहे. 

  • शिरूर – विद्यमान खासदार अमोल कोल्हे
  • सातारा – विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील
  • माढा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना आयात करुन
  • बारामती – विद्यमान खासदार सुप्रिया सुळे
  • जळगाव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षातून आयात करुन हर्षल माने
  • रावेर – आमदार एकनाथ खडसे
  • दिंडोरी – आदिवासी समाजाचे बडे नेते चिंतामण गावित
  • बीड – पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत नरेंद्र काळे
  • अहमदनगर – अजित पवार यांच्यासोबत असलेले निलेश लंके यांना परत बोलावून

मित्रपक्षांसाठी :

  • हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी
  • अकोला – वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबडेकर

अशा प्रकारे जवळपास 99 टक्के जागा वाटप आणि उमेदवारांची निवड अंतिम झाली असून येत्या सहा ते सात दिवसांमध्ये या जागांची आणि येत्या महिन्याभरात उमेदवारांच्या नावाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

follow us