Download App

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

Raosaheb Danve On Eknath shinde : मुख्यमंत्री बदलाच्या फक्त चर्चा आहेत, या टर्मला राज्यांमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्याचवेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारताच मंत्री दानवेंनी सांगितले की, आता सध्या मुख्यमंत्री शिंदे आहेत, मात्र पुढच्या निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती पाहून काय बदल होईल हे सांगता येत नाही, मात्र वेळनुसार, परिस्थितीनुसार एडीएचे वरिष्ठ नेते चर्चा करतील असेही यावेळी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता माध्यमांशी संवाद साधला.(Raosaheb Danve On cm eknath shinde ajit pawar pm narendra modi bjp ncp)

अजितदादांना कोणते काका जवळचे होते? शरद पवार सोडून इतरांशी कसे होते संबंध?

केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, भाजप कोणालाही कुठल्याही प्रकारचा धक्का देत नाही, ज्या लोकांना मोदींचे विचार पटतात ते आमच्या भाजपमध्ये सामील होतात. आम्ही कोणालाही फोडत नाही. त्याचवेळी पत्रकारांनी विचारले की, मंत्रिमंडळाचा विस्ताराचं काय झालं? त्यावर दानवे म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, योग्यवेळी ते विस्तार करतील, ते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरे गटापुढं लवकरच The End चा बोर्ड; शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा

महाविकास आघाडीत फूट पाडण्यात भाजपला यश आलं आहे. आधीच शिवसेनेचे 40 आमदार फोडून मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीला लक्ष्य करुन अजित पवार यांच्यासह 36 आमदारांना फोडण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चाही जोरदारपणे सुरु आहे.

एकीकडे सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात मोट बांधत असतानाच महाराष्ट्रात भाजपने विरोधकांचा सुपडाच साफ केला आहे. आता अजित पवार गटाने राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर भाजप, शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज