Download App

मराठा आंदोलकांचा रविकांत तुपकरांना दणका; लातूरमध्ये बैठक उधळली

Ravikant Tupkar : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर राज्यभरातील मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अंबादास दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज लातूरमध्ये (Latur) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना सकल मराठा समाजाने जाब विचारला.

दैनंदिन कामांसाठी आणि दौऱ्यांसाठी जाणाऱ्या नेत्यांना अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका राजकीय कार्यक्रमांना बसत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने गावांमध्ये जाणाऱ्या नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक गावांत पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.

सकल मराठा समाजाने रविकांत तुपकर यांची लातूरच्या औसा रस्त्यावर असणाऱ्या विश्रामगृहातील बैठक उधळून लावली. त्यांना मराठा आरक्षणाच काय झालं म्हणून जाब विचारला. राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली असताना तुम्ही लातूरमध्ये आलाच कसे, आंदोलकांनी तुपकर यांना विचारले.

आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला नो एन्ट्री, पूजेला आल्यास काळे फासू; मराठा समाजाचा इशारा

यावेळी रविकांत तुपकर विश्रामगृहात थांबले होते. मराठा आंदोलकांन त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘रविकांत तुपकर चले जाव’, ‘रविकांत तुपकर परत जा, परत जा’ अशा घोषणा आंदोलक देत होते. रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. बराच वेळ आंदोलक तुपकर यांच्यासमोर मोठ्या घोषणा देत होते. त्यानंतर तुपकर यांनी बैठक रद्द करत माघारी फिरले.

Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं

शंभूराज देसाई यांनाही रोषाचा सामना करावा लागला
मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी साताऱ्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रश्न विचारत मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाई यांना घेराव घातला. आजपर्यंत सरकारने फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला पण काम एक रुपयांच केले नाही, आरक्षण कधी देणार? एवढचं सांगा, असा सवाल करत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.

Tags

follow us