रविंद्र चव्हाण यांची ‘सायलेंट स्ट्राइक’खेळी; ठाण्यात भाजपला मजबूत करणारी खेळी

Ravindra Chavan : 'फ्रेंडली फाईट' टाळून युती एकसंध ठेवण्यावर चव्हाण यांनी भर दिला. रविंद्र चव्हाण यांच्या आशा भूमिकेमुळे कमी जागांतून भाजपचा प्रभाव पाडणारी खेळी असल्याचे विश्लेषक सांगताय.

Ravindra Chavan Bjp Thane

Ravindra Chavan Bjp Thane

Ravindra Chavan : ठाणे महापालिका (Thane Mahapalika) निवडणूक यावेळी केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादीत राहिलेली नाही. युतीतील सत्तासमीकरणं आणि भाजपच्या वाढत्या प्रभावाची कसोटी ठरतेय. 131 नगरसेवकांची संख्या असलेल्या ठाणे महापालिकेत बहुमतासाठी 66 जागांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची (Ravindra Chavan) भूमिका निर्णायक ठरणार असं दिसतंय.

शिवसेनेबरोबर संघर्ष टाळत समन्वयाची भूमिका
ठाणे महापालिकेतील एकूण 131 नगरसेवकांमुळे ही निवडणूक मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकांपैकी एक ठरलीय. मोठं बजेट, वाढती लोकसंख्या आणि विकासाचे प्रश्न यामुळे ठाण्याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय. युतीतील जागावाटप हा अत्यंत संवेदनशील मुद्दा मानला जातो. मात्र भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ठाणे महापालिका निवडणुकीत संघर्ष टाळत समन्वयाची भूमिका घेतलीय. त्यासाठी त्यांनी भाजपचा प्रभाव असलेल्या प्रभागावर ठाम दावा करताना, शिवसेना मजबूत असलेल्या भागांत समन्वय साधण्याची रणनीती आखली. ‘फ्रेंडली फाईट’ टाळून युती एकसंध ठेवण्यावर चव्हाण यांनी भर दिला. रविंद्र चव्हाण यांच्या आशा भूमिकेमुळे कमी जागांतून भाजपचा प्रभाव पाडणारी खेळी असल्याचे विश्लेषक सांगताय. (Ravindra Chavan ‘Silent Strike’; A move that strengthened BJP in Thane)

आम्ही आपतधर्म म्हणून तुमच्यासोबत, विचार सोडू शकत नाही; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला

ठाण्यात यावेळी उमेदवारांना पाणीपुरवठ्याची समस्या, खड्डेमुक्त रस्ते आणि वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, अनधिकृत बांधकाम, ठाण्याचा नियोजनबद्ध विकास या मुद्द्यांवर नागरिकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल म्हणूनच भाजपाने प्रचारात ठाण्याचं प्रगतीचं व्हिजन मांडायचं ठरवलं आणि त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट ठाणेकरांसोबत संवाद असा कार्यक्रम ठाण्यात झाला. कारण प्रदेशाध्यक्षांचा भौगोलिक जिल्हा म्हणून ठाण्यात बूथ लेव्हल संघटन मजबूत करण्यावर पक्षाने भर दिला. वॉर्डनिहाय आढावा, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वाटप यामुळे भाजपची निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे.

Video : पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत मिळणार; NCP च्या जाहीरनाम्यात दादांची गेमचेंजर आश्वासनं

मुंबई प्रमाणे ठाणे जिल्ह्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचं अस्तित्व मर्यादितच. त्यांचा फोकस मुंब्र्यापुरता. म्हणूनच ठाणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता नाही मिळवणे, तर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीची पायाभरणी मानली जातेय. ही निवडणूक रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीमुळे भाजपचं वजन वाढवणारी ठरेलं असा विश्वास व्यक्त होत आहे. राजकीय गणितं जुळवणारे नाव म्हणून रविंद्र चव्हाण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे.

Exit mobile version