Ravindra Dhangekar On Eknath Shinde Offer : कॉंग्रेस (Congress) पक्षाचे आंदोलन होत आहेत, बैठका होत आहेत. त्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर ते म्हणाले की, मी वरिष्ठांशी बोललो आहे. कामानिमित्त गावाला गेलो होतो. स्वारगेट प्रकरणी देखील मी बोललो आहे. पक्षाची बाजू मांडतच आहे. मला प्रत्येक बैठकीसाठी फोन असतो, बोलणं होतोय. मला कोणीही टाळत नाही. बहुतेक निमंत्रण पत्रिकेत माझं पहिलंच नाव असेल, असं देखील रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) स्पष्ट केलंय.
काही दिवसांपूर्वी रविंद्र धंगेकर हे शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. उदय सामंत यांची देखील त्यांनी भेट घेतली. यावर रविंद्र धंगेकर म्हणाले की, उदय सामंत हे माझे मित्र आहेत. गमछा हिंदुत्वाचा आहे. ती कायम घेवून फिरणारा कार्यकर्ता मी आहे. समोरच्या धर्माचा अनादर करणं, हे माझ्या धर्माने शिकवलं आहे. विरोधकांचा अपमान करणं हे शिकवलं नाहीये.
खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली का? CM फडणवीस म्हणाले, ‘हे काम अतिशय…’
अजूनही मी कॉंग्रेस पक्षातच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. त्यासंदर्भात बैठका घेतल्या जात आहे, नियोजन सुरू आहे. पुण्याची परिस्थिती चांगली ठेवायची असेल तर सर्वांना काम करावं लागणार आहे. रस्त्यावर एकटा धंगेकर उतरून काय करणार. मी दमून गेलोय. घसा कोरडा पडला आहे. उलट मलाच टारगेट केलं जातं, असं देखील धंगेकर म्हणाले आहेत.
देशाला सावरायचं आहे. पुढच्या पिढीचं भविष्य सावरायचं आहे. आम्ही नवीन प्रदेशाध्यक्षांना भेटणार आहे. सपकाळ साहेब हुशार माणूस आहे. सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तो माणूस ऑफिसमध्ये येवून प्रारंभ करून पुढील प्रवास सुरू करणारा आहे. मी एकनाथ शिंदे यांना लपून भेटलेलो आहे. ओपन भेटलो आहे, अंगावर पदर घेवून नव्हतो गेलो. माझं काम होतं, आम्ही एकमेकांशी बोललो. प्रवेशावर चर्चा झाली नाही. फक्त ते म्हणाले की, तुम्ही आमच्याकडे या.
मी कॉंग्रेस पक्षाचं काम करतो. कार्यकर्त्यांनी भगवा टाकला, श्रीराम म्हटलेत. तो त्यांचा विषय आहे. ते वेगळं काही नाहीये. मी मानवतावादी आहे, सर्वांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे जे चाललंय, त्याला सहमत नाहीये. बीडमध्ये जो प्रकार चाललाय, जर नेतेच चुकीचे वागत असतील तर त्याचा परिणाम पक्षावर होतो. कामचं झाले नाही, बिलं काढली. तर पक्षप्रमुखांचा हा पराभव आहे, अशी टीका देखील रविंद्र धंगेकर यांनी केलीय. जर सत्ताच भोगायची असेल, तर या महाराष्ट्राला केवळ भ्रष्टाचारीच सरकार मिळेल, असं देखील धंगेकरांनी स्पष्ट केलंय.