Ravindra Dhangekar : आरक्षण लवकरात लवकर दिले नाही तर मोठा स्फोट होणार…

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Martha reservation) लढत आहे. सरकारला जाग आणण्याचे काम मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. मात्र हे सरकार आरक्षण काही देत नाही. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केवळ आश्वासने दिली. ते सत्तेवर देखील आले मात्र त्यांना आजवर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता आला नाही. मात्र लवकरात लवकर जर समाजाला आरक्षण दिले […]

Ravindra Dhangekar1

मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांनी गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट नवख्या धंगेकरांपुढे अवघ्या ७ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Martha reservation) लढत आहे. सरकारला जाग आणण्याचे काम मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. मात्र हे सरकार आरक्षण काही देत नाही. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केवळ आश्वासने दिली. ते सत्तेवर देखील आले मात्र त्यांना आजवर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता आला नाही. मात्र लवकरात लवकर जर समाजाला आरक्षण दिले नाही तर मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे.

Ahmednagar News : ‘त्या’ तरुणाला मारताना तुम्ही गप्प का बसले? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल

काँग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या सुरु आहे. आज नगर शहरात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या यात्रेसाठी नगर शहरात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील माळीवाडा बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत या यात्रेला सुरुवात झाली.

‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर?

दरम्यान राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यातच मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. यातच याच मुद्द्यावरून आमदार धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच खोचक टीका केली आहे. धंगेकर म्हणाले, मराठा समाज आंदोलनासाठी झगडत आहे मात्र त्यांना अद्यापही आरक्षण मिळाले नाही. स्वतः फडणवीसांनी देखील स्वतः सत्तेत असताना आरक्षणाबाबत भाष्य केले. आरक्षण मिळून देतो असे म्हणाले मात्र तसे काही झाले नाही.

समाज आता आक्रमक झाला आहे. तसेच धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. सत्ताधारी केवळ आश्वासन देत आहे मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. मात्र आता दोनही समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मोठा स्फोट हा येत्या काळात होऊ शकतो अशी शक्यता आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

Exit mobile version