Ahmednagar News : ‘त्या’ तरुणाला मारताना तुम्ही गप्प का बसले? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे पाटलांवर निशाणा साधला आहे. अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचा पलटवार, ‘उद्धवजी, अहो किती रडताय…’
पुढे बोलताना थोरात म्हणाले, जर भंडारा हा पवित्र आहे तर त्या कार्यकर्त्याला मारहाण करण्याचा काहीच प्रश्न नव्हता. तसेच संबंधित युवकाला मारहाण होत असताना मंत्री राधाकृष्ण विखे हे गप्प का बसले? त्यांनी या गोष्टीला विरोध का केला नाही. विखे शांत का राहिले हा प्रश्न देखील उपस्थित होतो असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रशिक्षित ग्रासरूट जर्नालिझमची महत्वपूर्ण भूमिका, डॉ. गव्हाणे यांचे प्रतिपादन
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटून उठला आहे. जालन्यातील आंतरवली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठीच सरकारकडून हालचाली सुरु असतानाच आता मराठा समाजानंतर धनगर समाजाकडूनही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मागणी केली जात आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी जामखेडमधील चौंडीमध्ये धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहेत.
राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्याचवेळी धनगर आंदोलक शेखर बंगाळे हे विखे पाटलांना आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आले होते. त्याचवेळी बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळल्याची घटना घडली होती. त्यानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी बंगाळे याला मारहाण केल्याचं दिसून आलं होतं. याच मुद्द्यावरून बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मराठी मातीत येणार, मंत्री मुनगंटीवारांनी तारीखच सांगितली…
दरम्यान, काँग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या सुरु असून नुकतेच नगर शहरात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या यात्रेसाठी नगर शहरात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील माळीवाडा बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत या यात्रेला सुरुवात झाली.
काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर भंडारा फेकण्यात आल्याची घटना घडली. त्यांनतर संबंधित युवकाला तेथे उपस्थित असलेल्या काहींकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर विखेंनी प्रतिक्रिया देत भंडारा पवित्र असल्याचे वक्तव्य केले. विखेंच्या याच वक्तव्याचा थोरातांनी चांगलाच समाचार घेतला.