Asia Cup 2023: सुपर 4 फेरीत बांगलादेशने दिला दिग्गज खेळाडूला डच्चू, अशी आहे श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2023: सुपर 4 फेरीत बांगलादेशने दिला दिग्गज खेळाडूला डच्चू, अशी आहे श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2023: आशिया कपच्या सुपर 4 फेरीत आज बांगलादेशचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे दुपारी 3.00 वाजता सुरू झाला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्तफिजुर रहमानला बांगलादेशच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

आजचा सामना बांगलादेशसाठी ‘करा किंवा मरो’ अशी परिस्थिती आहे, कारण बांगलादेशने सुपर 4 मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध गमावला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हा संघ आता गतविजेत्या श्रीलंकेशी भिडणार आहे.

श्रीलंकेने गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते, परंतु त्यानंतर ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली गेली होती, तर यावेळी ती वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. पहिल्या फेरीत श्रीलंका आपल्या गटात अव्वल स्थानावर होता. श्रीलंका संघाने सलग 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

Ganesh Chaturthi 2023 : गणरायाच्या आगमनासाठी अहमदनगर पोलीस प्रशासन सज्ज

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन-
मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद.

katrina kaif: बॉलीवूडची अभिनेत्री सध्या काय करत आहे माहितीय का? नव्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन-
पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालेज, महिश थेक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube