Ganesh Chaturthi 2023 : गणरायाच्या आगमनासाठी अहमदनगर पोलीस प्रशासन सज्ज
Ganesh Chaturthi 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव आला असून हा गणेशोत्सव शांततेत पार पडावा. यासाठी अहमदनगर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत ३३४७ सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आले आहे. तसेच विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील ३२३ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्तीत-जास्त गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना विशेष बक्षीस देण्यात येणार आहे, अशी घोषणा नाशिक परिषदेचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केली.
Chhattisgarh Election : ‘इंडिया’ला धक्का! ‘आप’ने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी आज शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात नगर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
मोठी बातमी : सरकारचा प्रस्ताव मान्य नाही; उपोषण सुरूच राहणार – मनोज जरांंगे
यावेळी बाेलताना पाटील यांनी सांगितले, की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांवर हद्दपारीच्या कारवाया प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असणार आहे. आक्षेपार्य पोस्ट व मेसेज लाईक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल. नगर शहरात शासनाच्या निधीतून शहरातील विविध चौकात २०४ कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यामुळे शहरातील कोणत्याही भागात अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तत्काळ माहिती मिळणार आहे.
यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद ए मिलादची मिरवणूक आलेली होती. मात्र मुस्लिम बांधवांनी ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाज बांधवांचे आभार मानले. तसेच सर्व सण उत्सव नागरिकांनी शांततेत पार पडत या सण उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहनही पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर यांनी केले आहे.