katrina kaif: बॉलीवूडची अभिनेत्री सध्या काय करत आहे माहितीय का? नव्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

katrina kaif: तेलगू ब्लॉकबस्टर रोमँटिक कॉमेडी ‘मल्लीस्वरी’ मध्ये कतरिनाने आपले नशीब आजमावले असले तरीही, तिने शेवटी विपुल शाहच्या ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये व्यावसायिक यश मिळवले. अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिच्या आगामी चित्रपट ‘टायगर 3’ चे (Tiger 3) पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साह निर्माण झाला. ती तेवढ्यावरच थांबली नाही तर तिच्या नव्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीने आता नक्कीच, (Social media) ती नवीन काय घेऊन येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
View this post on Instagram
कतरिना कैफ तिच्या चाहत्यांना कायम मोहित करण्यात मास्टर प्लॅन करत असते. तिच्या अष्टपैलू अभिनायने कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री तर ती आहेच. तसेच सोशल मीडिया स्टोरी मधून तिच्या कारकीर्दीत, वैयक्तिक प्रवासात किंवा तिच्या यशस्वी के ब्युटी ब्रँडमधील महत्त्वपूर्ण प्रगती नेहमीच असल्याचे बघायला मिळत असते. आता या स्टोरीमधून ती नक्की काय नवीन करणार हे बघण खूप उत्सुकतेच असणार आहे.
कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये 16 जुलै 1983 रोजी झाला. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यापारी आहेत आणि तिची आई सुझॅन, एक इंग्लिश वकील आणि धर्मादाय कार्यकर्ता आहे. तिला सात भावंडे आहेत: स्टेफनी, क्रिस्टीन आणि नताशा नावाच्या तीन मोठ्या बहिणी; मेलिसा, सोनिया आणि इसाबेल नावाच्या तीन लहान बहिणी; आणि सेबॅस्टिन नावाचा मोठा भाऊ. इसाबेलदेखील एक मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. कतरिनाच्या आई-वडिलांचा ती लहान असताना घटस्फोट झाला आणि तिचे वडील अमेरिकेत गेले.
तसेच भारतात येण्यापूर्वी कतरिना तीन वर्षे लंडनमध्ये राहिली. वयाच्या 14 व्या वर्षी, कतरिनाने हवाईमध्ये एक सौंदर्य स्पर्धा जिंकली आणि तिला दागिन्यांच्या कॅम्पेनमध्ये मॉडेलिंगची पहिली नियुक्ती मिळाली. त्यानंतर तिने लंडनमध्ये व्यावसायिक मॉडेलिंग केले, फ्रीलान्स एजन्सीसाठी काम केले आणि लंडन फॅशन वीकमध्ये नियमितपणे हजेरी लावली.