छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मराठी मातीत येणार, मंत्री मुनगंटीवारांनी तारीखच सांगितली…
Sudhir Mungantiwar on Wagh Nakhe : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा (Afzal Khan) वध ज्या वाघनखांना केला. ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. आता ही वाघनखं (Wagh Nakhe) परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 1 ऑक्टोबरच्या रात्री लंडनला जाणार आहेत. याबाबत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली.
मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्यभिषेकाचं ३५० वर्ष आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्यात वर्षभरात 12 डाकतिकीट काढले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जय भवानी जय शिवाजी जयघोष करत रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना संपण्याचा विडा अफजलखानाने उचलला होता. हे स्वराज्यवरचं संकट होतं. अफझान खानने आपल्या प्रजेवर क्रूर अत्याचार केले होते. अफझान खानानं क्रूरतेचा कहर केला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केले होते. दोघांनीही सैन्य आणि शस्त्राशिवाय भेटायचे ठरवले. मात्र, अफझलखान किती क्रूर होता हे शिवाजी महाराजांना माहीत होते. शिवाजी महाराज अफजलखानाला भेटायला गेले तेव्हा अफजलखानाने महाराजांच्या पाठीवर वार केला. त्यानंतर वाघनखांनी महाराजांना त्याचा कोथळा बाहेर काढला. ही वाघनखं आमच्यासाठी श्रध्देचा विषया आहे. तिच वाघनखं भारतात आणले जाणार आहेत.
काँग्रेसचा ‘जनसंवाद’ यात्रेतून मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘जनतेच्या पैशातून मित्रांचे खिसे भरले’
ते म्हणाले, ही वाघनखं ब्रिटनला 1 ऑक्टोबरला जात आहे, 3 ऑक्टोबरला MOU करणार आहे. नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीवर हे वाघनखं हे महाराष्ट्रात आणले जातील. वाघनखं आणून गावा गावात नेऊन फिरवता येणार नाही. त्यामुळ छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवू. शिवभक्तांना दर्शनासाठी ही वाघनखं उपलब्ध असतील. ब्रिटिनमध्ये गेलेली जगदंबा तलवारसुद्धा भारतात आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरु आहे, असं ते म्हणाले.