Sudhir Mungantiwar : राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना कथित वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट दिली आहे.
महाविकास आघाडीकडून 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र आता या प्रकरणाचा तपास करून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.
माहितीनुसार, देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची (MVA) राज्यात सत्ता आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाविकास आघाडीने सरकारने विशेष समिती नेमली होती. आता या समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अहवालात समितीने चौकशी करून कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचा म्हटलं आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असून या प्रकरणात कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही तसेच राज्यात ही मोहीम यशस्वी झाली मात्र राज्यात मोहिम राबवताना काही अडचणी व त्रुटी राहिले असं या समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.
‘हा’ तर शिळ्या कढीला उत देण्याचा प्रकार, अजित पवारांना लंकेंचे प्रत्युत्तर
राज्यात या मोहिमेमुळे 52 कोटी वृक्षांची लागवड झाली असल्याचे देखील या अहवालात समितीने म्हटले आहे.
पुन्हा राजकीय भूकंप? छगन भुजबळांनंतर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला