पुन्हा राजकीय भूकंप? छगन भुजबळांनंतर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला

पुन्हा राजकीय भूकंप? छगन भुजबळांनंतर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला

Sunetra Pawar Meets Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. 15 जुलै रोजी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सिल्वर ओकवर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन बंद दाराआड तब्बल दीडतास केली.

तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार तासभरापेक्षा जास्त वेळ मोदी बागेत होत्या. शरद पवार यांच्याशी एक तास चर्चा केल्यानंतर सुनत्रा पवार मोदीबागेतून रवाना झाल्या आहेत.

तर दुसरीकडे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची पहिल्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता.

तर 15 जुलै रोजी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मी शरद पवारांच्या भेटीला गेलो तेव्हा पवार साहेब झोपलेले होते. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आराम करत होते. त्यानंतर एकदीड तासाने आमची भेट झाली. त्यामध्ये आम्ही एक ते दीड तास चर्चा केली.

दरम्यान, मी पवार साहेबांना सांगितलं मी मंत्री म्हणून, राजकारणी म्हणून किंवा राजकीय मुद्दा घेऊन आलो नाही. तुम्ही ओबीसींना आरक्षण दिलं. परंतु, आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली ती कठीण आहे. कुणी कुणाच्या दुकानात जात नाही अशी परिस्थिती आहे.

ठरलं! डोनाल्ड ट्रम्पच देणार जो बायडेनला टक्कर, तिसऱ्यांदा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

त्यावर आपण राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून यावर तोडगा काढला पाहिजे अशी विनंती आपण शरद पवारांना केली अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते शरद पवारांच्या भेटीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube