Sanjay Raut : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं.
“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल
सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली. तसेच गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, असा हल्लाबोलही राऊतांनी केली.
आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात माफिया राज पाहायला मिळत आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. राज्यात दररोज खून, लुटमारीच्या घटना घडत आहेत. सरकारी पैशाने गुंडगिरी वाढवली जात आहे. शिंदेच्या टोळीत पोलीस आणि गुंड एकत्र काम करतात. राज्यातील अनेक सरकारी कामे गुंडांना दिले जात असल्याचचा गंभीर आरोप राऊतांनी केला.
Madhuri Dixit : माधुरीचं नवं फोटोशूट, मनमोहक सौंदर्यांची चाहत्यांना भूरळ
राज्यात सध्या गुंडांसोबत चाय पे चर्चा
राऊत म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दीड वर्षात केवळ गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहेत. आमदार गुंडगिरीच्या जोरावर जमिनीवर कब्जा करत आहेत. न्यायालयाच्या आवारातून अपहरणाच्या घटना घडत आहेत. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, ते अदृश्य आहेत. चाय पे चर्चा करणारे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कधी चर्चा करणार? सध्या राज्यात गुंडांसोबत चाय पे चर्चा होत आहे, वर्षा बंगल्यावर गुंडासोबत चाय पे चर्चा होतेय, हे गृहमंत्र्यांना माहित आहे का? ठिकठिकाणी शिंदे गॅंगचे आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्यांसोबत चाय पे चर्चा करतातत, अशी टीका राऊतांनी केली.
फडणवीस हे अत्यंत अपयशी गृहमंत्री
यावेळी बोलतांना संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अपयशी आणि अकार्यक्षण गृहमंत्री आहेत. आमच्यावर टीका करण्यासाठी फडणवीस यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं आहे. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी तुमच्याकडे गृहमंत्री पद आहे. महाराष्ट्रातील जनता तुमचा राजीनामा मागत आहे. राज्यातील गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, असा हल्ला राऊतांनी केला.
कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची नावे पुढे आली. एकनाथ शिंदे यांची चौकशी व्हायला हवी होती. दुसरं कोणी असतं तर त्याची चौकशी केली असती. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे, मात्र महाराष्ट्रातील गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना डाब विचारला जात नाही, अशी टीकाही राऊतांनी केली.