Download App

कुणावर गुन्हा दाखल झाला, कुणाला अर्धच मंत्रिपद मिळालं? रोहित पवार-विखेंमध्ये आता जुंपली

Rohit Pawar Vs Radhakrishna vikhe patil: ईडीच्या चार्जशीटमध्ये तुमचे नाव आले आहे. त्यामुळे आता इडीला उत्तरे द्या.

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar Vs Radhakrishna vikhe patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने (ED) त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यावरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna vikhe patil) यांनी एका ओळीत उत्तर दिलंय. ईडीच्या चार्जशीटमध्ये तुमचे नाव आले आहे. त्यामुळे आता इडीला उत्तरे द्या, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय. त्याला रोहित पवार यांनी उत्तर देताना त्यांचा कारखाना आणि मंत्रिपद याचा संबंध जोडला आहे.


अहमदाबाद विमान अपघात घडला की घडवला?, विमान सुरक्षा तज्ज्ञ मोहन रंगनाथन यांची थेट उत्तरं

माननीय विखे-पाटील साहेब आपण माझ्यावर loose comment केल्याचं कळलं. स्तविक आपल्या घराण्याचं सहकार क्षेत्रातील काम खूप मोठं असून त्याचा कायमच आदर आहे. त्यामुळं आपल्यासारख्या नेत्याने माझ्यावर असं वक्तव्य करणं शोभत नाही. घोटाळे केले म्हणून चार्जशीटमध्ये माझं नाव आलं की सत्ताधाऱ्यांपुढं झुकलो नाही म्हणून आलं हे आपल्याला न्यायालयाच्या माध्यमातून लवकरच कळेल, पण घोटाळे केले म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुणावर गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळं कुणाला अर्धच मंत्रिपद मिळालं? याचंही उत्तर आपण द्यावं, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.

मिठाचे अतिरिक्त सेवन धोकादायक! एकावेळी फक्त चिमूटभरच मीठ खाणं ठरणार फायदेशीर

प्रकरण काय ?
रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडने अवसायनात निघालेला छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी कारखाना खरेदी केला. हा साखर कारखान्याची केवळ 50 कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. नियमांचं पालन न करता हा व्यवहार झाला असून, हा कारखाना जाणूनबुजून कमी किमतीत विकण्यात आला, असा संशय ईडीला आहे. शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता पवारांच्या नातेवाईकांना कमी किंमतीमध्ये सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप ठेवला गेला आहे. रोहित पवारांसह काही जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहेत.

follow us