Download App

…तर राज्याच्या अस्मितेचा जुगार झाला; बावनकुळेंच्या व्हायरल फोटोवर रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा फोटो खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसने एक्सवर शेअर केला होता. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हल्लाबोल केला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांचा आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटले?
कोण कुठे जाऊन जुगार खेळतय, कोण कुठे जाऊन काय करतय याच्याशी महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. परंतु आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांचा आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, त्यामुळे उगाच बिनकामाच्या गप्पा न मारता मुद्द्याचं बोला हीच आज राज्याची मागणी आहे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

‘माझ्याकडं 27 फोटो अन् 5 पाच व्हिडिओ, भाजपचं दुकानच बंद पडेल’; संजय राऊत कडाडले

संजय राऊत यांनी काय म्हटले?
19 नोव्हेंबर. मध्यरात्री. मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

चित्र वाघ यांचे संजय राऊतांना प्रत्त्युत्तर
सर्वज्ञानी संजय राऊतजी.. सोशल मीडियावर मोठ्या उत्साहात व्हायरल झालेल्या या व्हिडिओकडे लक्ष द्या. यावरही तुमच्या डिटेक्टिव्ह एजन्सीच्या माध्यमातून या व्हिडिओची माहिती गोळा करा, ज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षासारखा चित्रातील व्यक्ती कोणासोबत आणि कोणत्या हॉटेलमध्ये फिरत आहे? याचा पण नाना पटोलेंनी तपास करायला हवा आणि तोही सीबीआयच्या माध्यमातून’, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लागवला आहे.

अजित पवारांच्या भाषणादरम्यान गोंधळ; ‘पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा’ झळकावले बॅनर

चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण
यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण आहे आहे. ते म्हणाले की, ‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.’

Tags

follow us