अजित पवारांच्या भाषणादरम्यान गोंधळ; ‘पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा’ झळकावले बॅनर
Ajit Pawar : भंडाऱ्यात शासन आपल्या दारी (Shasan Applya Daari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण सुरु असताना अचानक गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ असल्याने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोषणा देणारे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांचे नाव विनोद वंजारी असल्याचे समजते.
पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत हातातले बॅनर फडकावले. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांना तात्काळ ताब्यात घेऊन कार्यक्रम स्थळावरुन बाहेर नेले. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत होते. त्याचवेळी हा गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
‘मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर पुजारी पळून जातील’; वडेट्टीवारांचं नवा वाद पेटवणारं विधान
भंडारा येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरु असताना गोंधळ सुरु झाला. खुर्च्या खाली करा अशा घोषणा देण्यात बॅनर फाडण्यात आले. यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाची अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप भंडारा जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
Chagan Bhujbal : आम्ही कोणाची घरं जाळली? समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रश्नावर भुजबळ भडकले
शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सरकारकडून लोकांना अनेक लाभ दिले जात आहेत. हे लोकाभिमुख सरकार आहे. लोकांना हे सरकार त्यांचं वाटलं पाहिजे. सव्वा वर्षात अनेक चांगले निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. एका रुपयांत पीक विमा योजना त्याचंच एक उदाहरण आहे. याच योजनेत अग्रीम नुकसान भरपाई दिली जातेय. आता पर्यंत 47 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 964 कोटींची मदत दिली गेली. उर्वरित एक हजार कोटी लवकर दिले जाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमातून दिली.