Download App

‘अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास, पुतण्या म्हणून मी….’ रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar Reaction On Ajit Pawar Desire to become CM : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की, मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे व्हावी, अशी सर्वांची इच्छा होती. नुकतंच अजित पवार यांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर देखील रोहित पवार यांनी (Rohit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.

अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर त्या पदाच्या वर मुख्यमंत्रिपद राहते. साहाजिकच आहे, एवढे वर्ष तुम्ही दोन नंबरच्या पदावर राहिले असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्रि‍पदाची व्हावी. सरकारमध्ये ते आहेत. जर सरकारच्या माध्यमातून दादांना संधी दिली जात (Maharashtra Politics) असेल, तर त्यांना ते आवडेलच. कुटुंबाला आवडेल. कार्यकर्त्यांना त्यांच्या इतर नेत्यांना आवडेल. मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल, पण ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 53 टक्के होण्याची शक्यता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद मिळत असेल, तर नक्कीच मी त्याचं स्वागत करेन. आनंदसुद्धा व्यक्त करेल. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास, पुतण्या म्हणून मी त्यांचं स्वागत करेन, अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या आहेत.

स्वप्न कधी छोटी नसतात! अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ 23 मे रोजी प्रदर्शित होणार

तर रोहित पवार यांना देखील पक्षात एक नवीन जबाबदारी मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर त्यांनी म्हटलंय की, अजून आमच्यासोबत काही चर्चा झालेली नाही. शेवटी निर्णय पवार साहेब, जयंत पाटील आणि सुप्रिताताई घेत असतात. नक्कीच योग्य असा निर्णय सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत तिथे घेतला जाईल, असा विश्वास आम्हाला आहे. नुसतं हवेवर जी चर्चा सुरू आहे, त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असं देखील रोहित पवार यांनी केलंय.

सरकारमध्ये निधी वाटपावरून वाद होताना दिसत आहे. सगळ्याच विभागात कट लागला आहे. हे सरकार नीट चालत नाहीये. त्यांच्याकडे पैसा नाहीये, अर्थकारण नाहीये. नुसतं टीकासत्र सरकारमध्ये चालु आहे, केवळ एकमेकांची डोकी फोडणं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्राचं मोठं नुकसान होतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

 

follow us